जळगाव येथील सलून दुकानदाराच्या हत्या प्रकरणी धुळे जिल्हा नाभिक बांधवांनी सांत्वन भेट…
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत कडक शासन करण्याची मागणी…
दोंडाईचा- (श. प्र.) जळगाव येथे नाभिक दुकानदार बांधव कै. सुनिल सुरेश टेमकर यांची दारु पिण्यासाठी व ब्लेड न दिल्याच्या राग आल्याने त्या तरुणाची तीक्ष्ण हत्याराने निर्गुन हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. धुळे जिल्ह्याचे अखिल भारतीय जिवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मयत सुनील टेमकर यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली आहे.
या घटनेतील या सराईत गुन्हेगारांना कडक शासन व्हावे व या कुटुबांला न्याय मिळावा या करीता जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. प्रविण मुंडे यांच्याशी चर्चा करून गुन्हेगारांना कडक शासन व्हावे व कुटुंबाला न्याय मिळावा अशी भावना अ.भा.जिवा सेनेचे प्रदेश अध्यक्ष दिनेश महाले यांनी व्यक्त केली.
तसेच मयत कै .सुनिल टेमकर यांचे कुटुंबाची घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांची आई ,दोन भाऊ,कै.सुनिल टेमकर यांची पत्नी व त्यांचे लहान लहान एक मुलगा व एक लहान मुलगी यांची भेट घेताना डोळे न कळतच पानावले. अंत्यत दुर्दैवी घटनेमुळे घरातील कर्ता पुरूष केल्याने परिवार उदवस्त झाला आहे, अखिल भारतीय जिवा सेना, महाराष्ट्र, जळगाव व सर्व कार्यकारणी या परिवाराच्या दुखात सहभागी असुन या परिवारास शक्य ती मदत करण्याचे त्यांनी सांगितले आहे.
या प्रसंगी जिवा सेनेेचे प्रदेशअध्यक्ष दिनेश महाले, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुधीर महाले, जळगाव जिल्हाध्यक्ष देविदास फुलपगारे, जिल्हा सचिव डॉ नरेंद्र महाले, जिल्हा निरीक्षक किरण नांद्रे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल टोगे, जिल्हा सह सचिव संजय सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल जगताप, जिल्हा संघटक प्रकाश झुरके, शहर अध्यक्ष विशाल कुंवर, पारोळा येथील सुरेश कुंवर, धुळे येथील संत सेना सोसायटीचे चेअरमन बापू सैंदाणे, अक्षय सैंदाणे, नाभिक समाज बांधव व अखिल भारतीय जिवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.







