पटेल शाळेत संविधान दिवस साजरा
त-हाडी
शिरपूर शहरातील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
दिनांक २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस शहरातील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांकडून संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. संविधान उद्देशिकेचे वाचन विद्यालयातील शिक्षक विवेकानंद ठाकरे यांनी केले.
कोरोना काळात गेल्या दोन वर्षापासून शाळा बंद आहेत. शहरातील आर.सी. पटेल प्राथमिक शाळेत संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना बोलावण्यात आलेले होते. यावेळी विद्यार्थ्यांकडून संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच लवकरच शाळा सुरू होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
केंद्रप्रमुख अनिल बाविस्कर यांनी सविधाना विषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी विचार व्यक्त केले.तसेच भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या महामानवांचे नेहमी स्मरण केले पाहिजे.असेही मार्गदर्शन केले.
यावेळी केंद्रप्रमुख अनिल बाविस्कर, विद्यालयाचे मुख्याध्यापक सी डी पाटील, गजेंद्र जाधव, प्रशांत चौधरी,अशोक पाटील, अरुण हातेडकर,सुशीला मराठे, वसंत भामरे, गणेश चौधरी, महेंद्र माळी, किशोर राजपूत, विनोद माळी, जितेंद्र करेंके, योगेश बागुल आदी उपस्थित होते.






