त-हाडी
नंदुरबार- आज दि 26/11/2021 वार-शुक्रवार रोजी स्वा. सै. श्री .गोकुळदास देसाई आदर्श मराठी विद्यामंदिर व गुजराथी विद्यामंदिर ,नंदुरबार येथे माझे संविधान दिन, माझा अभियान सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन..आदर्श मराठी विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. मिनाक्षी भदाणे व गुजराथी विभागाचे मुख्याध्यापक श्री भद्रेश त्रिवेदी सर यांच्या हस्ते महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पूजन करण्यात आले.
भारतीय संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाविषयी जाणीव जागृती आणि भारतीय संविधानातील मुलतत्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगीकार करावा तसेच संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरिता दिनांक 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान माझे संविधान माझा अभिमान अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी भारतीय संविधान व माझ्या शाळेतील संविधान दिवस या विषयांवर आधारित वकृत्व, रांगोळी व चित्रकला या शैक्षणिक उपक्रमांचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला मुख्याध्यापिका मिनाक्षी भदाणे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
आपल्या भारतीय संविधानाविषयी श्री तुषार सोनवणे सर यांनी माहिती सांगितली. तसेच 26 /11 च्या मुंबई येथे झालेल्या हमल्यात शाहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री अशोक सोनार, नितेश नाथजोगी, मनोज वानखेडे, फकिरा माळी, विनोद बोरसे ,निलेश बागुल ,दीपिका शाह, वंदना देवरे ,दिपश्री माळी यांनी परिश्रम घेतले 🙏🙏






