सत्यशोधक जन आंदोलन संघटना वतीने त-हाडी येथे संविधान दिन साजरा
त-हाडी- प्रतिनिधी
आज दि 26/11/2021 वार-शुक्रवार रोजी . सत्यशोधक जन आंदोलन संघटना त-हाडी वतीने येथे माझे संविधान दिन, माझा अभियान सप्ताहानिमित्त कार्यक्रम आयोजन.. केले त्यावेळी युवा मल्हार सेनेचे जिल्हाअध्यक्ष सुनिल धनगर. माजी उपसरपंच गणेश भामरे, पोस्ट मास्तर तारचद जाधव, यांच्या हस्ते महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचेचे व संविधानाचे पूजन करण्यात आले.
भारतीय संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाविषयी जाणीव जागृती आणि भारतीय संविधानातील मुलतत्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगीकार करावा तसेच संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरिता दिनांक 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान माझे संविधान माझा अभिमान अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी भारतीय संविधान व संविधान दिवस या
आपल्या भारतीय संविधानाविषयी तुळशिराम भामरे तंटामुक्त अध्यक्ष यांनी माहिती सांगितली. तसेच 26 /11 च्या मुंबई येथे झालेल्या हमल्यात शाहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौतम अहिरे किरण अहिरे प्रविण अहिरे सिध्दार्थ अहिरे गौतम (पप्पू) अहिरे यांनी परिश्रम घेतले व भिकाजी अहिरे,भिमराव अहिरे गणेश अहिरे,पुनंमचंद अहिरे,आबा अहिरे,राहुल महिरे,कपिल अहिरे ,गौतम भालेराव ,असे उपस्थित होते







