कोल्हापूर दि. २८( माणगंगा प्रतिनिधी कमल धडेल)
” रोया ” परत ये ” च्या आर्त हाके चा हंबरडा मित्रानी स्मशान भूमीत फोडला .
जोतिबा येथील रोहित संजय दादर्णे ( वय .२६) या
युवकांचा मृत्यु मनाला चटका लावणारा ठरला .
तरुण मुलाचा अचानक मृत्यू
झाल्याने जोतिबा गावात शोक व्यक्त केला जात आहे .
रोहित संजय दादर्णे यांचा अवघ्या वयाच्या २६ व्या वर्षी मृत्यु झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. रोहित हा पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती विष्णुपंत दादर्णे व जोतिबा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच जगन्नाथ दादर्णे यांचा तो पुतण्या होता .रोहित प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने त्यांचा मित्र परिवार मोठा होता . रोहितच्या पश्चात आई , वडील , आजी , एक भाऊ , चार चुलते असा मोठा परिवार आहे. रोहितच्या मृत्युचे वृत्त कळताच जोतिबा डोंगरावर शोककळा पसरली . नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकत होता .
मित्र परिवाराकडून स्मशान भूमीत “रोया परत ये “अशी आर्त हाक मारली जात होती .पुढील महिन्यात लग्न होणार होते . त्यांची तयारी सुरु असतानाच मृत्यु झाल्याने ग्रामस्थामधून हळहळ व्यक्त होत आहे . मित्रपरिवारांनी डिजीटल फलक , व्हॉट्सअप स्टेटस लावून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली . व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली.रोहितची एक्झिट मनाला चटका देणारी ठरली .







