भारतीय बौद्ध महासभेच्या इंदापूर तालुका संघटकपदी प्रा.बाळासाहेब मखरे
इंदापूर (प्रतिनिधी) : इंदापूर शहरातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. बाळासाहेब मखरे यांची दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा इंदापूर तालुका संघटक पदी एकमताने निवड करण्यात आली.
इंदापूर येथील विश्रामगृहात इंदापूर तालुका पदाधिका-यांच्या निवडी विषयी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे जिल्हा अध्यक्षा आयु. सुजाताताई सोनकांबळे यांचे हस्ते प्रा. बाळासाहेब मखरे यांना सन्मानपूर्वक नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी प्रा. मखरे यांनी धम्म कार्यासाठी स्वत:ला झोकून देण्याचे आश्वासन दिले.







