खर्दे येथील पटेल शाळेत प्रवेशोत्सव
त-हाडी
भाटपुरा शासनाच्या आदेशान्वये खर्दे येथील आर सी पटेल मराठी प्राथमिक शाळा खर्दे येथे दिनांक १ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता चिमुकल्या बालगोपालांचे वाजत-गाजत स्वागत करण्यात आले.
यावेळी शिरपूर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी जी पी कुमावत, शाळेच्या मुख्याध्यापिका क्रांती जाधव यांच्या शुभहस्ते सरस्वतीचे पूजन करण्यात आले. बालगोपाळांना गुलाब पुष्प देऊन,औक्षण करून व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले.
शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी मास्क व सोशल डिस्टंसिंग च्या आदेशांचे पालन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश शिरसाठ यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी लालसिंग राजपूत, रूपाली राजपूत, छाया पाटील, अनिल माळी, विजय गुजर,राजेंद्र पवार यांनी परिश्रम घेतले.







