महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास विनम्र अभिवादन
शिरपूर तालुक्यातील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा टेकवाडे येथे दि.6 डिसेंबर 2021रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न,ज्ञानाचा अथांग महासागर , महामानव डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्यात आले.
कोरोना नियमांचे पालन करीत प्रत्येक वर्गातील काही विद्यार्थी प्रतिनिधी व शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रतिमा पुजन करून विनम्र अभिवादन केले.
विद्यार्थ्यांना महामानव डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन पटातील काही महत्वपूर्ण घटना,त्यांनी विद्यार्थी दशेतील शिक्षणासाठी केलेला संघर्ष,समाजात पसरलेली जातीय विषमता,अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांना समजावून सांगा असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक श्री आर.बी.खोंडे यांनी वर्गशिक्षकांना केले.अभिवादन कार्यक्रमासाठी शाळेतील उपशिक्षक श्री एस.एस.पटेल,श्री पी.व्ही.कोळी,उपशिक्षिका श्रीमती बी.बी.काटोळे,श्रीमती एस.जी.सोनार शिक्षकेतर कर्मचारी श्री बी.एल.पावरा,श्री ए.बी.ईशी उपस्थित होते.







