लोकशाही मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिपक वाघ यांचा लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने भव्य सत्कार.
धुळे – स्वभावाचे,निर्भिड,निडर आणि सडेतोड लिखाणासाठी परिचित असलेले पञकारीता क्षेञातील जाणते व अनुभवी व्यक्तीमत्व आणि विद्रोही साहित्यिक पत्रकार मा. श्री.दीपक वाघ यांची नुकतीच लोकशाही मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन व त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे….
उत्तर महाराष्ट्र लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने देखील त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला आहे यावेळी भाजप पक्षाचे तथा धुळे महानगरपालिकेचे महापौर मा. श्री प्रदीप नाना कर्पे व लोकजनशक्ती पार्टी चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री दिलीप आप्पा साळवे व लोजपाच्या धुळे महिला अध्यक्षा शोभाताई चव्हाण, तसेच कुंदन दादा खरात यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला आहे…..
सदर कार्यक्रमाचे आयोजन लोकजनशक्ती पार्टी च्या वतीने करण्यात आले होते.
प्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी धुळे महापालिकेचे महापौर श्री प्रदीप नाना कर्पे, लोकजनशक्ती पार्टी चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री.दिलीप आप्पा साळवे, लोजपाच्या धुळे जिल्हा महिला अध्यक्षा शोभाताई चव्हाण, कुंदन दादा खरात, मधुकर चव्हाण, सुरज साळवे, देविदास केदार, पत्रकार रोशन खैरनार,गौतम वाघ, मुरलीधर वाघ, शुभम साळवे, गोकुळ पाटील, सम्राट देवरे,आदी यावेळी उपस्थित होते..
लोकशाही मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक वाघ यांनी कार्यक्रम आयोजकांचा मनःपूर्वक आभार व्यक्त केले…







