जोयदा जिल्हा परिषद शाळेत दिव्यांगांसाठी कार्यक्रम
त-हाडी
भाटपुरा शिरपूर तालुक्यातील जोयदा जिल्हा परिषद मराठी शाळेत दिव्यांगांसाठी प्रभातफेरी काढण्यात आली.तसेच सदर शाळेने जागतिक समान संधी सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.
शिरपूर तालुक्यातील जोयदा येथील जिल्हा परिषद शाळेत दिव्यांगांसाठी जागतिक समान संधी सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.शाळेत दिव्यांग विदयार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा,घोषवाक्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, गायन स्पर्धा,वेवभूषा स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
तसेच दिनांक ७ डिसेंबर रोजी जोयदा गावात प्रभातफेरी काढण्यात आली. तर दिव्यांगांची मुलाखत ही घेण्यात आली. प्रभातफेरीत शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. नीता सोनवणे,विशेष शिक्षक राहूल पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेरसिंग पावरा,केंद्रप्रमुख दिपक पाटील, मुख्याध्यापक मधूकर पाटील, चंद्रकांत पवार, प्रदिप पवार, हिरामण धूम, कृष्णा पावरा,अर्चना सुर्यवंशी हजर होते.







