बंकटस्वामी विद्यालय खडकीघाट विद्यालय येथे बालविवाह प्रतिबंधक कायदा व बालमजुर संरक्षण कायदा याविषयी जनजागृती कार्यक्रम साजरा.
बीड
पाटोदा…
बंकटस्वामी विद्यालय खडकी घाट विद्यालयात बालविवाह कायदा आणि बाल संरक्षण कायदा विषयी जनजागृती कार्यखक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री पुरी सर आणि माननीय केंद्रप्रमुख श्रीअंकुश राठोड सर तसेच जि.प.प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापिका मा.रिंगणे मँडम या होत्या.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय सावंत सर हे होते . या कार्यक्रमाची सुरुवात वैकुंठवाशी ह.भ.प. बंकटस्वामी महाराज आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले
नंतर विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींचे बालविवाह प्रतिबंध या विषयावर भाषणे झाले यात कुमारी वैष्णवी बोराटे वर्ग 8वी. विठ्ठल जाधव वर्ग 9 वी कु.स्वरूपा विश्वास भोसले वर्ग 9 वी कु.धारवाडकर धनश्री वर्ग 9 वी कु. गायकवाड ऋतुजा 9 वी.कु.वाघ साक्षी वर्ग 10 वी कु.ढास प्रतिक्षा वर्ग 10 वी. यांची भाषणे झाली
यानं त्यानंतर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे असणारे तज्ञ मार्गदर्शक श्रीमान पुरी सर यांनी मार्गदर्शन करताना आजची स्त्री अंगापिंडाने सुदृढ नाही पूर्वीच्या महिला शरीराने भक्कम असल्यामुळे त्यांना डिलिव्हरी मध्ये त्रास होत नव्हता बालविवाहाचे प्रमाण कमी झाले पाहिजे असे सांगितले तर दुसरे प्रमुख पाहुणे केंद्रप्रमुख माननीय राठोड सर यांनी आपल्या भाषणात बालविवाह ही एक समस्या आहे बालविवाह असुशिक्षीत समाजामध्ये जास्त होतात हे सांगून बालविवाह रोखले पाहिजेत हे सांगितले बालविवाह घडत असताना निदर्शनास आल्यास मुख्याध्यापक शिक्षक पोलीस पाटील यांना कल्पना द्या हेही सांगितले.
तर अध्यक्षीय भाषणात श्री सावंत सर यांनी बाल विवाहाची व्याख्या सांगून विवाहासाठी मुलीचे वय 18 तर मुलाचे वय ते 21 असले पाहिजे तसेच बाल संरक्षण कायद्याविषयी माहिती देताना सांगितले बालकांवर अत्याचार त्यांच्या नातेवाईक शेजारी व परिचित लोकांकडूनच होतात हे रोखले पाहिजेत बालकांवरील अत्याचार होतातच परंतु गर्भात सुद्धा मुलं सुरक्षित नाही मुलगी नको म्हणून भ्रूण हत्या यांचे प्रमाण समाजात वाढत आहेत हे रोखले पाहिजेत या प्रसंगी त्याची भ्रूण हत्या वरील कविता “आई! गर्भातच माझा नको घेऊ जीव” गाऊन दाखवली.
या कार्यक्रमास गावातील काही प्रतिष्ठित नागरिक तसेच शाळेतील सर्व शिक्षक श्री रामहरी रिंगणे, श्री संकेत सुपेकर, श्री आनेराव, श्री महेश मोरे, तानाजी खाकरे, अविनाश खाकरे, श्री पोपट कुरे, श्री अशोक मांजरे, श्री संजय बनसोडे, बाबुराव कानडे, कल्याण अनंत्रे,आणि वर्ग 5 वी ते वर्ग 10 वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुरेश भोसले बापू यांनी केले तर आभार प्रदर्शन आनेराव सर यांनी केले व कार्यक्रम संपला







