नाभिक समाजाचे द्वितीय साहित्य संमेलन शेगावात ; साहित्यीक , लेखक यांसह कार्यकर्त्यांनी हजर रहाण्याचे आवाहान
त-हाडी ( प्रतिनिधी ) दि १६
: नाभिक समाजाचे द्वितीय साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे १५ जानेवारी २०२२ ला शहरातील विघ्नहर्ता हॉल येथे हे एकदिवसीय साहित्य संमेलन होणार आहे. ‘महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघा’ने या साहित्य संमेलनाचं आयोजन केले असून महाराष्ट्रातुन साहितीक व समाज बांधव यांनी हजर रहावे असे आवाहान महेंद्र खोंडे यांनी केले आहे .
शेगाव येथे होणाऱ्या या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी पुणे येथील सुप्रसिद्ध लेखक, मार्गदर्शक आणि व्याख्याते डॉ. प्रदीप कदम यांची निवड करण्यात आली आहे. ते अमरावती येथे झालेल्या पहिल्या नाभिक साहित्य संमेलनाचे मावळते संमेलनाध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर यांच्याकडून संमेलनापदाची सुत्रे स्विकारतील. सातारा येथील सुप्रसिद्ध लेखक, कादंबरीकार आणि व्याख्याते कॅप्टन महेश गायकवाड हे या संमेलनाचे उद्घघाटक असतील. यात समाजातील साहित्यिकांना व्यासपीठ निर्माण करून देणा-या ‘विशेष स्मरणिके’चं विमोचन होणार आहे. सोबतच समाजातील लेखक साहित्यीक या सहअनेक मान्यवरांचा या संमेलनात गौरव करण्यात येणार आहे. गौरवमूर्तीमध्ये आंतरराष्ट्रीय हेअर डिझायनर उदय टके, स्पर्धा परिक्षा पुस्तकांचे यशस्वी लेखक ‘के सागर’, सामाजिक कार्यकर्त्या सुमनताई पवार, अलिबागचे सुप्रसिद्ध हेअर डिझायनर सुशील भोसले, अहमदनगरचे अशोक औटी, अखिल भारतीय जेष्ठ नागरिक समाजाचे भालचंद्र गोरे, क्रांतीकारक विचारांचे कार्यकर्ते गोविंद दळवी, सुधाकर सनंसे, अखिल भारतीय सेन समाजाचे पुखराज राठोड, नाशिकचे समाधान निकम, समाजातील जळगावचे प्रथम आयएएस सौरभ सोनावणे, व-हाडी शब्दकोशकार शिवलिंग काटेकर आणि नागपूर येथील मराठी वाड्.मयाच्या अभ्यासक रिता धांडेकर यांचा समावेश असणार आहे.
संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शेगावची स्थानिक आयोजन समिती संमेलन यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहे. या संमेलनाला राज्यभरातील बांधवांनी उपस्थित राहत साहित्याचा आस्वाद घेण्याचे आवाहन महाराष्ट्र नाभिक कलादर्पण संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य नाभिक सेना प्रतिनिधी महेंद्र खोंडे यांनी केले आहे.







