• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

हिंद संस्थेच्या पुढाकाराने विभागीय व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पशुपालकांच्या भेटीला

माणगंगा by माणगंगा
December 16, 2021
in महाराष्ट्र
0
हिंद संस्थेच्या पुढाकाराने विभागीय व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पशुपालकांच्या भेटीला

हिंद संस्थेच्या पुढाकाराने विभागीय व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पशुपालकांच्या भेटीला

नेकनूर प्रतिनिधी…

विभागीय अधिकारी आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांची टीम नेकनूर व परिसरातील शेळीपालन व कुटकुटपालन भेटीसाठी आली होती. यामध्ये डॉ. संजय गायकवाड, सहा. आयुक्त, प्रादेशिक पशुसंवर्धन अधिकारी, औरंगाबाद, डॉ. प्रशांत चौधरी, सहा आयुक्त, पशुसंवर्धन विभागीय रोग अन्वेषण प्रयोग शाळा औरंगाबाद, डॉ. वल्लभ जोशी, सहा. आयुक्त, पशूसंवर्धन पशू वैद्यकीय सर्व चिकित्सालय औरंगाबाद, डॉ.प्रदीप झोड, उप आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन औरंगाबाद, डॉ. बोयळ, उप आयुक्त जिल्हा पशुसंवर्धन बीड, डॉ. विजय देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी बीड, डॉ. रमाकांत सितळे, सहा. पशुधन विकास अधिकारी, सहा. आयुक्त प्रादेशिक पशुसंवर्धन कार्यालय औरंगाबाद, डॉ. मधुकर मंगरुळकर, सहा. पशुधन विकास अधिकारी, सहा. आयुक्त प्रादेशिक पशुसंवर्धन कार्यालय औरंगाबाद, डॉ. आसाराम काळे, पशुधन विकास अधिकारी नेकनूर, आदि अधिकारी एकत्रित होते. यांनी प्रथम हिंद संस्था कार्यालयास भेट दिली.

यावेळी संस्थेचे सचिव संजय शिंदे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. नंतर हिंद शेतकरी गटासोबत डॉ. सितळे यांनी चर्चा करतांना सांगितले की, जनावरांना लसीकरण करण्यासाठी संस्थेने आपल्या कार्यक्षेत्रातील गावात जागृतीचे काम करावे म्हणजे पशू संवर्धनासाठी मोठी मदत होईल. सर्व अधिकारी यांनी कुंभारी येथील शेतकरी वसंत शिंदे यांच्या बंदीस्त शेळीपालन शेडला भेट दिली. शिंदे हे निवृत्त शिक्षक असून मागील ८ वर्षापासून हा व्यवसाय करत आहेत.

त्यांनी सांगितले की, एक वर्षाला एक शेतीपासून कमीत कमी १२ हजार रुपये नफा मिळतो. त्यांच्याकडे सर्व शेळ्या या बोअर जातीच्या आहेत. त्यांचे एक बोकड २४ हजार रुपया पर्यंत विकलेले आहे. आज त्यांच्याकडे लहान मोठ्या ४० शेळ्या आहेत.

वर्षा कमीत कमी सर्व खर्च वजा जाता ३ ते ४ लाख रुपये उत्पन्न होते. यावर आणखी उत्पादन कसे वाढवता येईल यासाठी नवीन गवत, तुती लागवड, अहार आणि बाजार याचे नियोजन कसे असावे याविषयी डॉ. संजय गायकवाड यांनी माहिती दिली. पुढे नेकनूर येथील शेतकरी मुकुंद काळे, बिबिषण बापू शिंदे व राजेंद्र शिंदे यांच्या बंदीस्त शेळीपालन शेडला भेट दिली. यावेळी बिबिषण शिंदे यांनी सांगितले की, मी नेकनूर बाजार व परिसरातून सहा शेळ्या विकत घेवून सुरुवात केली. एका वर्षात मी १२ बोकड विकून लहान मोठ्या २२ शेळ्या आहेत.

मला पहिल्या वर्षात सर्व खर्च जाता ५० हजार रुपये नफा झाला. डॉ. मधुकर मंगरुळकर यांनी सांगितले की, तुमच्या कडे नेकनूर परिसरातील ब्लॅकगोल्ड शेळी आहे. ती उंच, मोठी, वजनदार, कमीत कमी दोन पिल्ले देणारी आणि अजाराला बळी न पडणारी शेळी आहे. तिचा सांभाळ केला तर आणखी उत्पादन वाढेल. क्रॉस ब्रेडला कमी महत्व देवून स्थानिक शेळीला जास्त महत्व दिले तर अधिक उत्पादन मिळते व मर किंवा इतर रोग आणि खर्च कमी येतो. या विषयातील तीन दिवसाचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शेतकऱ्यांना वेळोवेळी केले जाईल असे सांगितले.

Views: 615
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
रंगकर्मी शिलेदार क्रिकेट लीग २०२१ (पर्व ३रे) आयोजित क्रिकेट स्पर्धा संपन्न……!

रंगकर्मी शिलेदार क्रिकेट लीग २०२१ (पर्व ३रे) आयोजित क्रिकेट स्पर्धा संपन्न……!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)