आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार सदाशिव पुकळे यांचा सन्मान
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार सदाशिव पुकळे यांचा सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागामध्ये उत्कृष्ट वृत्तसंकलन केल्याबाबत त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
त्यांच्या कामाची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाने त्यांना पुणे, कोल्हापूर विभागाच्या प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे
अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे अध्यक्ष मा. देवेंद्र मोरे, उपाध्यक्ष मा.बाळासाहेब गोरे आणि प्रसिद्धी प्रमुख मा.महेश्वर तेंटाबे यांनी मुंबई मधून घोषणा केली.
त्यांची झालेली निवड ही मराठी पत्रकार संघाच्या वतीने अभिमानाची बाब असल्याने आज त्यांचा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व दैनिक केसरीचे तालुका प्रतिनिधी सतीश भिंगे, ज्येष्ठ पत्रकार किशोर पुजारी, तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी सुरज मुल्ला, दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी नागेश गायकवाड ,दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी प्रशांत भंडारे, दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी लक्ष्मण सरगर, दैनिक लोकमतचे खरसुंडी प्रतिनिधी विक्रम भिसे, दैनिक सकाळचे दिघंची प्रतिनिधी गणेश जाधव ,दैनिक जनमतचे तालुका प्रतिनिधी अंकुश मुढे उपस्थित होते







