अखिल भारतीय नाथपंथी महासंघ बीडच्या वतीने नाथ दिनदर्शिकेचे मोठ्या उत्साहात प्रकाशन सोहळा संपन्न
पाटोदा-
अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे याहीवर्षी नाथ दिनदर्शिका 2022 चे उद्घाटन व प्रकाशन सोहळा मा. डॉ . कैलास पैठणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठवाड्याचे अध्यक्ष सोमनाथ धायडे औरंगाबाद हे होते तर प्रमुख पाहुणे औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय कांचन धायडे तसेच महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेले कीर्तनकार ह.भ.प.भरत महाराज जोगी परळी तसेच माजी ग्राम विकास अधिकारी भारत चव्हाण मा.झनझणे साहेब प्राध्यापक बालकनाथ यादव सर श्रीमती जयाताई चव्हाण श्रीमती सुमनताई कदम मुख्याध्यापक संजय सावंत सर बीड जिल्ह्याचे अध्यक्ष केदारनाथ चव्हाण सर यांच्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाचा श्रीगणेशा नवनाथांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आला तसेच या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविकात दिनदर्शिकाचे महत्त्व कार्याध्यक्ष श्री संजय सावंत सर यांनी सांगितले. नंतर ह.भ.प.भरत महाराज जोगी यांनी दिनदर्शिका काढण्यात हेतू समाजाला सांगितला तसेच दिनदर्शिके मुळे एकमेकाचे संबंध वाढून समाज जोडला जातो हे सांगून दिनदर्शिका हे चालते बोलते महासंघाचे महान कार्य आहे हेही सांगितले .माननीय भारत चव्हाण ग्राम विकास अधिकारी यांनी नाथ बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले
.तसेच प्राध्यापक यादव सर यांनीही संघटनेत सर्वांनी भाग घेऊन काम करावे हे सांगितले तर बीड जिल्हा अध्यक्ष केदारनाथ चव्हाण सर यांनी महासंघ स्थापन झाल्यापासून ते आज पर्यंत काय काय कामे केले हे सांगून संघटनेत सर्वांनी येऊन एकमेकांना सहकार्य करून संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत हे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सोमनाथ धायडे मराठवाडा अध्यक्ष यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना बीड जिल्हा महासंघ महाराष्ट्रात एक नंबर काम करत आहे हे सांगितले तर बीड जिल्ह्यातील कार्यकर्ते महासंघ वाढविण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत हेही सांगितले दिनदर्शिका अतिशय आकर्षक तयार करून नाथ बांधव महासंघाचा प्रसार करीत आहेत ही कौतुकाची बाब आहे बीड जिल्ह्यासाठी आम्ही आपल्या वरिष्ठ राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जयाजीनाथ साहेब यांच्याकडे बीड जिल्हा किती कार्यरत आहे याची कल्पना देऊन आणि बीड जिल्ह्यासाठी जी मदत हवी सहकार्य हवे ते करण्यास भाग पाडू असे आश्वासन दिले.
या कार्यक्रमात जिल्हा सचिव हरिभाऊ भराडी जिल्हा संघटक रंगनाथ पैठणकर मा. हरिदास बामणे मा. सुरेश वाघमारे गणेश शिंदे दत्ता शिराळकर उत्तम पांचाळ बाळनाथ कराळे अनिरुद्ध चव्हाण भैरवनाथ शिंदे सर राजकुमार शेळके नरसिंग नागरगोजे पंढरीनाथ निकम धर्मराज जाधव गोकुळ शिंदे बाबासाहेब पवार नवनाथ जाधव परमेश्वर पवार डॉक्टर प्रशांत चव्हाण डॉक्टर सुरवसे जगन्नाथ कराळे अक्षय बामणे माननीय आदिनाथ जाधव लक्ष्मण चव्हाण नवनाथ शिंदे भैरवनाथ सुरवसे नरसिंह नागरगोजे नवनाथ शिंदे सुभाष करंडे नारायण कराळे महादेव पवार सुमित चव्हाण बलराम इरगट तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहून खूप सहकार्य केले.
तसेच इतर नाथबांधव व भगिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय रंजना शिराळकर मॅडम वडवणी यांनी अतिशय बहरदार व काव्यमय शैलीत केले तर शेवटी आभार माननीय श्री संजय सावंत सर यांनी मानले या कार्यक्रमाचे आयोजक रविकिरण चव्हाण माननीय ग्रामविकास अधिकारी भारत चव्हाण साहेब यांच्यातर्फे केलेल्या स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली







