नाभिक समाजाकडून तुकाराम राठोड यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान
त-हाडी प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ अंतर्गत नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्थेच्या वतीने आयोजित चौथ्या सर्वसाधारण सभेत आज दिनांक 18 /12/ 2021शनिवार रोजी दत्तजयंतीच्या दिवशी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्या सभेमध्ये नाभिक समाजातील माजी जिल्हाध्यक्ष श्री तुकाराम शंकर राठोड काथर्दे तालुका शहादा यांना संस्थेमार्फत त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन मानाचा समाजभूषण पुरस्कार सर्व संचालका मार्फत देण्यात आला.
त्यावेळेस नाभिक समाजातील राष्ट्रसंत संतसेना महाराज पुण्यतिथी निमित्त रक्तदान केलेल्या समाज बांधवांना संस्थेचे व रक्तपेढीचे अशा दोन प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले व त्या कार्यक्रमात सेवानिवृत्त झालेल्या चौदा कर्मचाऱ्यांचा देखील सपत्नीक सत्कार करण्यात आला. नाभिक समाजामार्फत शासकीय सेवेतील कर्मचारी असतात ज्यांनी आपली सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झालेल्या असतात अशां या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार संस्थेमार्फत करण्यात येत असतो.त्यानंतर विविध यश निवड प्रमोशन झालेल्या समाजबांधवांचा देखील सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेचे संचालक सौ शशिकला सोनवणे व ज्ञानेश्वर सोनवणे यांनी समाज भूषण श्री तुकाराम राठोड यांना पेन्सिलच्या साहाय्याने त्यांचे स्केच चित्र त्यांना भेट म्हणून दिले.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे राज्य अध्यक्ष माननीय श्री कल्याणराव दळे, महामंडळाचे सचिव पांडुरंग भवर उपस्थित होते, तसेच कार्यक्रमाला प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र शिंदे ,समाजभूषण राज्य कार्यकारिणी सदस्य. सौ मीनाक्षी पंकज भदाणे मुख्याध्यापिका समाजभूषण प्रदेश अध्यक्षा अखिल भारतीय जीवा सेना, सौ भारती ताई सोनवणे अध्यक्ष, सौ जयश्री निकम महिला जिल्हाध्यक्षा उपस्थित होते. संस्थेमार्फत समाजासाठी गेल्या चार वर्षात विविध उपक्रम घेण्यात आले भाऊबीज भेट म्हणून माता-भगिनींना साडी वाटप करण्यात आली,सलून दुकानदार बांधवांना दहा हजार बिनव्याजी कर्ज वाटप करण्यात आले, संस्थेमार्फत दरवर्षी विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम घेण्यात येतो. कोरोना काळात समाज बांधवांना किराणा किट वाटप करण्यात आले, समाजातील विद्यार्थ्यांसाठी बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली, तळागाळातील समाजबांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्था कार्यरत आहे, संस्थेमार्फत आतापर्यंत विविध प्रकारचे सव्वीस उपक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर श्री विजय सैंदाणे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पंकज भदाणे संस्थेचे जिल्हाध्यक्ष यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व संचालक मंडळांनी सहकार्य केले. कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव श्री अरविंद निकम,गजेंद्र जाधव उपाध्यक्ष, हिमांशू बोरसे उपाध्यक्ष शिवाजी मिस्तरी सहसचिव, छगन भदाने कोषाध्यक्ष, प्रकाश देवरे प्रसिद्धीप्रमुख,पुरूषोत्तम सोनवणे सल्लागार,प्रभाकर चित्ते सल्लागार , संचालक सुधीर निकम, नितीन मंडलिक, विजय सैंदाणे ,शशिकला सोनवणे, विजय सोनवणे, विनोद सूर्यवंशी, अनिल भदाने, ज्ञानेश्वर शिरसाठ, विजय सैंदाणे ,जितेंद्र हिरे, प्रभाकर बोरसे ,भाईदास बोरसे, प्रदीप सोनवणे, ओंकार शिरसाठ, एकनाथ चित्ते ,मयुर सूर्यवशी, प्रविन वरसाळे, गणेश पवार, राजेश सूर्यवंशी, नरेंद्र महाले, अनिता सूर्यवंशी, मीनाक्षी भदाने, प्रकाश सैदाणे,छगन सूर्यवंशी भालचंद्र जगताप लक्ष्मीकांत निकम व नाभिक समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार हिमांशू बोरसे यांनी केले.







