पेपरलेस कार्यालय संदर्भात शिरपूर येथे कार्यशाळा
त-हाडी ता.21
पंचायत समिती शिरपूर येथे पेपर मुक्त ग्रामपंचायत करिता ग्रामपंचायत केंद्र चालकांची विशेष कार्यशाळा घेण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामपंचायतीचा कारभार ऑनलाइन पद्धतीने व्हावा नागरिकांना ग्रामपंचायत अंतर्गत असलेले विविध दाखले सहज उपलब्ध व्हावे या उद्देशाने ऑनलाइन प्रणालीला गती देण्यात येत आहे.
ग्रामपंचायतींचे नमुना नंबर आठ,नमुना नंबर 9, जन्म-मृत्यू नोंदणी, विवाह नोंदणी तसेच ग्रामपंचायतींचे 1 ते 13 नमुने ऑनलाईन करणे त्या व्यतिरिक्त ई ग्राम सॉफ्ट मधील इतर नोंदी,15 वा वित्त आयोग प्रणाली या विषयांवर गट विकास अधिकारी युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समन्वयक महेश वाडीले यांनी कार्यशाळा घेतली या कार्यशाळेस विस्ताराधिकारी संजय पवार विस्ताराधिकारी आर.जे. पावरा यांनी विशेष मार्गदर्शन करून तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती पेपर मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
फोटो शिरपूर पंचायत समिती शिरपूर येथील कार्यशाळेत मार्गदर्शन करताना विस्ताराधिकारी संजय पवार विस्ताराधिकारी आर जे पावरा तालुका समन्वयक महेश वाडीले व तालुक्यातील केंद्र चालक







