फुले एज्युकेशन तर्फे समताच्या सपना माळी करणार सत्यशोधक पद्धतीने विवाह
उस्मानाबाद- फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन पुणे चे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला पदाधिकारी सत्यशोधिका सपना किसनराव माळी BE. Comp, आष्टा कासार उस्मानाबाद आणि सत्यशोधक विष्णू आनंदराव शिवणकर,BE. Mech, गिरगाव,हिंगोली यांचा दि.26 डिसेंबर 2021 रोजी दु.12.30 वाजता आष्टा हायस्कूल ,आष्टा कासार ,उस्मानाबाद येथे महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने थोर समाजसुधारक महात्मा फुले यांचे 131 व्या स्मृतींनानिमित व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या 190 व्या जयंतीनिमित्ताने सत्यशोधक विवाह सोहळा आयोजित केलेला आहे.
या विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर ,भारतीय रेल्वे बोर्ड चे सदस्य शंकरराव बोरकर , अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.मंजिरी धाडगे ,सावता परिषद चे अध्यक्ष कल्याणराव आखाडे व अनेक मान्यवर तसेच सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित रहाणार आहेत.
हा उस्मानाबाद व मराठवाड्यातील पहिला व फुले एज्युकेशन तर्फे गेल्या 3 वर्षातील 29 वा सत्यशोधक विवाह संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक हे महात्मा फुले यांचे वेशभूषेत लावणार आहेत तर महात्मा फुले रचित मंगळाष्टकाचे गायन प्रा.सुदाम धाडगे व सत्यशोधक रोहिदास तोडकर करणार आहेत.यावेळी अक्षता म्हणून सुगंधी फुलांच्या पाकळ्या व सर्व मान्यवरांना नवदाम्पत्याच्या हस्ते महापुरुषांचे ग्रंथ भेट दिले जाणार आहेत.







