मनसे व शेतकरी संघटनेच्या वतीने पत्रकार सदाशिव पुकळे यांचा सन्मान
आटपाडी प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शेतकरी संघटना यांच्या वतीने पत्रकार सदाशिव पुकळे यांचा सन्मान करण्यात आला.
ग्रामीण भागातील उत्कृष्ट वृत्तसंकलन केल्याबद्दल ,त्यांच्या कामाची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाने त्यांना पुणे, कोल्हापूर विभागाच्या प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे
अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे अध्यक्ष मा. देवेंद्र मोरे, उपाध्यक्ष मा.बाळासाहेब गोरे आणि प्रसिद्धी प्रमुख मा.महेश्वर तेंटाबे यांनी मुंबई मधून घोषणा केली.
यावेळीशेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश जुगदर, मनसेचे जिल्हा सचिव राजेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान पिंजारी, तालुकाध्यक्ष संजय पाटील, शेतकरी सेना तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड ,तालुका उपाध्यक्ष शरद ढोकळे, वाहतुक सेना तालुका अध्यक्ष मारुती खिल्लारी ,खरसुंडी विभाग अध्यक्ष अजित खंदारे, दिघंची विभाग अध्यक्ष शंकर मोटे, पुजारवाडी शाखा अध्यक्ष वैभव मोटे, दैनिक जन्मत चे तालुका प्रतिनिधी अंकुश मुढे, तालुका महिला आघाडीच्या अध्यक्ष मनीषा खांडेकर, एस जे न्यूज चे प्रतिनिधी समाधान जगदाळे व मान्यवर उपस्थित होते









