बालिका दिन उत्साहात साजरा
शिरपूर तालुक्यातील खर्दे येथील आर सी पटेल प्राथमिक शाळेत ३ जानेवारी रोजी “बालिका दिन” उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सदस्य त्याप्रसंगी रंजना गुजर, सरपंच सविता पटेल उपसरपंच जयश्री पटेल यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांसाठी भेटकार्ड व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. शाळेतील इयत्ता- बालवाडी ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनींनी बनवलेल्या भेटकार्डचे व रांगोळ्यांचे निरीक्षण करण्यात आले.यातून क्रमांक काढण्यात आले.क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.
यावेळी विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले, जिजामाता, अहिल्याबाई होळकर आणि झाशीची राणी या क्रांतीकारकांच्या वेशभूषा केल्या होत्या.
सदर स्पर्धामध्ये शाळेतून कार्यक्रमात २०५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका क्रांती जाधव यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रमेश शिरसाठ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी छाया पाटील,लालसिंग राजपूत, रुपाली राजपूत, अनिल माळी, विजय गुजर व राजेंद्र पवार यांनी परिश्रम घेतले.







