पटेल प्राथमिक शाळेत बालिका दिन साजरा
शिरपूर शहरातील आर सी पटेल प्राथमिक शाळेत तीन जानेवारी बालिका दिवस साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस दरवर्षी बालिका दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी शाळेत विविध कार्यक्रमांनी बालिका दिवस साजरा करण्यात आला.
शहरातील आर. सी. पटेल प्राथमिक शाळेत बालिका दिनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात विद्यार्थ्यांसाठी भेटकार्ड व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमात बक्षीस देण्यात आले.
यावेळी नगरसेविका छाया ईशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय वरसाळे, मुख्याध्यापक सी.डी.पाटील आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विद्यालयातील महिला शिक्षिका व महिला पालक यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. बी. पाटील यांनी केले. बक्षीस पात्र विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन वसंत भामरे व के.डी. राजपूत यांनी केले. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर योगेश बागुल या शिक्षकांनी प्रकाश टाकला तर आभार गणेश चौधरी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशांत चौधरी, विवेकानंद ठाकरे,गजेंद्र जाधव,महेंद्र माळी,विनोद माळी, अरुण हातेडकर,सुवर्णा सुर्वे,सुशीला मराठे,उज्वला पाटील राजेश्वरी ढिवरे,संजाली शिरसाळे,जितेंद्र करंके,पूनम सूर्यवंशी, अर्चना जोशी,संगीता चव्हाण,वैशाली बारी,शुभांगी बाविस्कर आदींनी मेहनत घेतली.







