गुरुच्या अगोदर देशसेवा करुन शिष्य झाला सेवानिवृत्त
पाटोदा ;
पाटोदा.पासून २कि.मी.अंतरावर
असलेल्या नफरवाडी येथील श्री सुभेदार गोपीनाथ ढेरे सन १९९१ साली भारतीय सैन्यात भरती झाले.सैन्यात असतांना बाँडी बिल्डर असल्यामुळे खेळात चमक दाखविली.त्यामुळे त्यांना सैन्यातर्फे आंतरराष्ट्रीय व जागतिक पातळीवर निरनिराळ्या स्पर्धांसाठी पाठवण्यात येत असे.यात आंतरराष्ट्रीय व जागतिक पातळीवर मिडल त्यांनी देशाला प्राप्त करून दिले.
तसेच त्यामुळे त्यांना देशाची सेवा करण्यास जास्त संधी मिळाली.जवळजवळ ३२ वर्ष नोकरी केली. सुभेदार गोपीनाथ ढेरे यांचे गुरु श्री संजय सावंत सर हे 1989 साली शिक्षक म्हणून नोकरीला लागले आणि आज तागायत ते शिक्षकी पेशात आहेत त्यांची ही बढती मुख्याध्यापक पदी झाली आहे. त्यांना ही राज्यस्तरीय निरनिराळे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत .
आपला शिष्य सुभेदार गोपीनाथ ढेरे हा सही सलामत सेवानिवृत्त होवून आपल्या जन्मगावी येऊन गावाची सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आला आहे.समाज सेवा करायची अशी इच्छा व्यक्त गुरु जवळ केली म्हणून नफरवाडीकर व मुख्याध्यापक श्री संजय सावंत सर यांनी त्यांचा गावी आल्यावर सुभेदार गोपीनाथ ढेरे यांचा शाब्बासकी देत सपत्नीक सत्कार केला.याप्रसंगी गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.