*आदर्श मराठी /गुजराती विद्यामंदिर येथे जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा सप्ताह अंतर्गत यशोगाथा यशस्वी महिलांच्या. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
नंदुरबार-येथील स्वा.सै. श्री. गोकुळदास देसाई आदर्श मराठी विद्यामंदिर व गुजराती विद्यामंदिर येथे जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्रातील लेकींचा सप्ताह साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ए.पी.आय.सौ नयना विलास देवरे मुख्याध्यापिका सौ. मिनाक्षी भदाणे मॅडम, गुजराती विभागाचे मुख्याध्यापक श्री भद्रेश त्रिवेदी सर ,समन्वयक श्री युवराज पाटील सर हे उपस्थित होते. यावेळेस सावित्रीबाई फुले आणि जिजामाता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी श्री फकीरा माळी सर यांनी सूत्रसंचालन केले. सौ नयना देवरे यांनी यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील अनेक छोट्या प्रसंगातील उदाहरणे सांगून आजच्या दिवसाचे महत्त्व पटवून दिले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका सौ मिनाक्षी भदाणे यांनी थोर व्यक्तींची जयंती, पुण्यतिथी का साजरी करावी.यावर मत मांडले.तर श्री निलेश बागुल सर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री मनोज वानखडे,दिपीका शाह, निलेश बागूल, प्रमोद खैरनार तसेच सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.







