“महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ खटाव तालुकाध्यक्ष पदी नितीन राऊत यांची निवड
मायणी/प्रतिनिधी:-
गेली पंधरा वर्षे दुष्काळी भागातील शेतकरी व सर्वसामान्यांना लेखणीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणारे पत्रकार नितीन राऊत यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या खटाव तालुकाध्यक्ष पदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
याच बरोबर संघटनेच्या सातारा जिल्हा उपाध्यक्ष पदी दत्ता कोळी (मायणी)यांची फेरनिवड तर माण तालुका अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार एल के सरतापे यांची खटाव तालुका कार्याध्यक्ष पदी सतिश डोंगरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
संघटनेचे जेष्ठ नेते वसंतराव मुंढे ,विश्वासराव आरोटे,राज्य संघटक संजय भोकरे,जिल्हाध्यक्ष प्रवीण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे. पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच पत्रकारांवर होण्याऱ्या अन्याय विरोधात लोकशाही मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी यापूर्वी अनेक आंदोलनात सहभागी झाले होते. व्यसनमुक्तीचा नारा देत त्यांनी आध्यात्मिक विचारांचा वारसा जपला आहे. त्यांच्या निवडीने खटाव तालुक्यातील प्रामाणिक व निस्वार्थी पत्रकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
त्यांच्या निवडीबद्दल खटाव-माण चे आमदार जयकुमार गोरे, हरणाई सूत गिरणीचे युवा नेते रणजितसिंह देशमुख,माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, वडूजचे माजी नगराध्यक्ष डॉ महेश गुरव,मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, रासपचे युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर,जनता क्रांती दलाचे सत्यवान कमाने,जिल्हा उपाध्यक्ष संजीव साळुंखे,नगरसेवक शहाजीराजे गोडसे, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष विजय शिंदे,आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाचे आपगे,जिल्हाध्यक्ष संतोष डांगे,राजाराम कचरे,शिवसेनेचे युवराज पाटील, उद्योजक विक्रम रोमन,मा. नगरसेवक श्रीकांत उर्फ काका बनसोडे, पांडुरंग तारळेकर,अपंग संघटनेचे अमिन आगा, ,मनसेचे युवा नेते सुरज लोहार, आर पी आय चे गणेश भोसले, राष्ट्रवादी वडूज शहराध्यक्ष अक्षय थोरवे ,पोलीस उप अधीक्षक डॉ निलेश देशमुख, स. पो. नि.मालोजीराव देशमुख,पीएसआय पालेकर,वन विभागाचे अधिकारी शितल फुंदे व जेष्ठ पत्रकार दिलीप पुस्तके,अजित जगताप,पत्रकार प्रकाश सरमुख, पदमनील कणसे,धनंजय चिंचकर, महेश तांबवेकर, आकाश यादव,मुन्ना मुल्ला, आयाज मुल्ला, डॉ विनोद खाडे, केदार जोशी व संतोष सुतार, सचिन सुकटे, रशीद शेख, दत्तात्रय इनामदार, समीर तांबोळी ,स्वप्नील कांबळे,प्रशांत कोळी,निनाद जगताप व विविध सामाजिक संघटनेच्या पद्धधिकार्यांनी अभिनंदन केले.
राज्यातील पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असणारी व राज्यातील जेष्ठ संपादक,पत्रकार यांच्या नेतृत्वाखाली ९ हजारांवर पत्रकारांची सभासद संख्या असणाऱ्या *महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे काम जनसेवा हिच ईश्वरसेवा माणून काम सुरू आहे. त्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे,प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या सुचनेनुसार व सातारा जिल्ह्याध्यक्ष प्रवीण कांबळे, इलेक्ट्रॉनिक मिडीया जिल्हाध्यक्ष विकास भोसले यांच्या समन्वयातून मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्हा कार्यकारणी व तालुकाध्यक्ष पदावर सन्मानिय पत्रकार बांधवांच्या निवडी पत्रकार दिनाच्या निमित्ताने घोषीत करण्यात आल्या आहेत.
यामध्ये :-
सातारा जिल्हा सचिव – संदीप चेणगे
सातारा शहर अध्यक्ष- चंद्रकांत पवार
सातारा जिल्हा उपाध्यक्ष- सचीन बर्गे
सातारा जिल्हा उपाध्यक्ष- नितिन ढापरे
सातारा जिल्हा उपाध्यक्ष- दत्ता कोळी
कराड दक्षिण तालुकाध्यक्ष – माणिक डोंगरे
कराड उत्तर तालुकाध्यक्ष-बाळकृष्ण गुरव
कराड शहराध्यक्ष-प्रमोद तोडकर
सातारा तालुकाध्यक्ष- दत्ता घाडगे
पाटण तालुकाध्यक्ष-बाबासाहेब सुतार
जावली तालुकाध्यक्ष- वसीम शेख
कोरेगाव तालुकाध्यक्ष- राजेंद्र पवार
महाबळेश्वर तालुकाध्यक्ष-सादिक सय्यद
माण तालुकाध्यक्ष- एल.के सरतापे
खटाव तालुकाध्यक्ष-नितिन राऊत
खंडाळा तालुकाध्यक्ष- सागर पवार
खटाव तालुका कार्याध्यक्ष- सतीश डोंगरे
सातारा तालुका उपाध्यक्ष-राहुल ताटे-पाटील
सातारा जिल्हा सल्लागार-विजय जाधव
सातारा जिल्हा सल्लागार-उमेश पाटील
सातारा जिल्हा सल्लागार-सतीश चव्हाण
सातारा जिल्हा सल्लागार-प्रमोद पंचपोर
सातारा जिल्हा सल्लागार-उमेश सुतार
सातारा जिल्हा सल्लागार-संतोष खालकर
कराड-पाटण संपर्क प्रमुख-विजय गवळी
खंडाळा-फलटण संपर्क प्रमुख-आबासाहेब शिंदे
कायदेविषयक सल्लागार- अँड. विठ्ठलराव येळवे
उंब्रज-पाल विभाग प्रमुख- दिलीपराव साळुंखे
कायदेविषयक सल्लागार- अँड अरुण मदने
कराड तालुका महिला संघटक – सौ.स्नेहल निकम
यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आपल्या माध्यमातून पत्रकार तसेच समाजातील गरजू, दिन दुबळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपले हात सदैव झटत राहो हिच सदिच्छा देताना प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंढे, व प्रदेश महासचिव विश्वासराव आरोटे यांनी नूतन पदाधिकाऱ्याचे मनपूर्वक अभिनंदन करून संघटनेशी संलग्न झल्याबद्दल आभार मानले.










