कला वाणिज्य महाविद्यालायकडून माझी वसुंधरा अंतर्गत उपक्रम संपन्न
मायणी दि.६ (प्रतिनिधी) :-
येथील कला, वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र मायणी येथे स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व पत्रकारांचा यथोचित सत्कार आयोजित करण्यात आला. ‘माझी वसुंधरा’ या उपक्रमा अंतर्गत हा कार्यक्रम राबविण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कोळी ,पत्रकार पोपट मिंड (दै.पुढारी),मारुती पवार (दै. जनमत), संदीप कुंभार ( दै. लोकमत), स्वप्नील कांबळे ( दै. मुक्तागिरी), ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश सुरमुख, (दै. पुण्यनगरी ), ,महेश जाधव (दै. प्रभात ), ,प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी, आरोग्य अधिकारी डॉ. तुरुकमाने, डॉ. ताटे, आरोग्य सहायक डॉ.जयप्रकाश पाटील, अभिनेते राहुल घोलप, उत्तमराव सपकाळ फाउंडेशनचे मिलिंद देशमुखे, रा. से. यो. स्वयंसेवकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर स्वच्छता केली. विद्यार्थी, प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.







