सरकारच्या आयचा घो ! कोरोनाच्या नावाखाली शिक्षणाचा बट्याबोळ.
शासनाच्या शाळा बंदच्या निर्णयाला पालकांचा विरोध.
त-हाडी प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचा नविन व्हेरीयंट ओमिक्रॉनच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रादुर्भावामुळे शासनाने राज्यातील शाळा दिनांक 10 जानेवारी सोमवार पासुन बंद केल्याने शासनाच्या शाळा बंदच्या निर्णयाला पालकांकडुन चागला विरोध होत असल्याचे पाहण्यासमिळतआहे.हॉटेल,बार,चित्रपटगृह.सभा,कार्यक्रम,दारू दुकाने हे सर्व सुरू असल्याने सरकार कडुन कोरोनाच्या नावाखाली शाळा बंद ठेवुन शिक्षणाचा बट्याबोळ सुरू केल्याचा आरोपही पालकातुन होत आहे.
तब्बल दीड वर्षानंतर जेमतेम महीना दोन महीने सुरू झालेल्या शाळा बंद केल्याने विद्यार्थ्याच्या नशिबी पुन्हा एकदा ऑनलाईनचा फेरा आला आहे.प्रत्यक्ष शिक्षणातुन मिळणाऱ्या गुणांमुळे देशाची भावी पिढी आडानी होत असल्याने शासनाच्या या निर्णायाला अनेक पालकातुन विरोध केला जात आहे. तब्बल दीड वर्ष घरी बसुन ऑनलाईन शिक्षणाचा वनवास संपला आसे वाटत आसताना ग्रामीण व शहरी भागात कोरोनाचे नेम पाळवुन शाळा सुरू झाल्या होत्या आवघ्या एक ते दीड महिन्यातच पुन्हा शाळा बंद करण्याचा शासनाने निर्णय घेतल्याने या निर्णयाचा विरोधात पालका सह शिक्षणप्रेमीकडुन सोशल मिडीयावर प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.
……चौकटीत……….
नेहमीच्या लॉकडावुनमुळे बैध्दिकविकास खुंटनार..
दीड वर्षा पासुन नेहमीच लॉकडावुन पडत राहील्याने विद्यार्थ्याचा बैध्दिक विकास खुंटचत राहीला.या खुटलेल्या बैध्दिक विकासाला कुठ तरी चालनामिळु लागली होती पंरतु अवघ्या एक ते दिड महिन्यातच शाळा बंद केल्याने विद्यार्थ्यांचा बैध्दिक विकास हा कायमचाच खुंटणार आसल्याचे दिसुन येत आहे.
उद्याचे आधार स्तंभ बैध्दिक विकंलाग आसाल तर ….
शाळा बंद ठेवुन शासन विद्यार्थ्यांचे नुकसान करत आसल्याचा आरोप पालका सह शिक्षण प्रेमिकडुन व्यक्त केले जात आसुन उद्याचे आधार स्थंभ आसलेल्या विद्यार्थ्यांचे बैध्दिक विकंलाग आसाल तर च उद्याचा समाजच निर्माण होईल आसेही मत सोशड मिडीयावर व्यक्त केले जात आहे.
प्रतिक्रीया………
शासनाने कोरोनाचे नेह पाळवुन दीड वर्षा नंतर सुरूझालेल्या शाळा परत चालु ठेवायला हावेत यांमुळे विद्यार्थ्यांच्या बैध्दिक मतेचा विकास होवुन पुढील पिढी घडली जाईल.
:- प्रकाश पवार, पालक तोंदे.
गांव पातळीवर ग्रामपंचायतने शाळा सुरु ठेवण्याचा ठराव घेवुन तो जिल्हाधिकाऱ्याना देवुन कोरोनाचे सर्व नेम पाळवुन शाळा सुरू करण्याच्या हालचाली कराव्यात.
– संतोष पाटील,पालक.त-हाडी
शासनाने शाळा बंदचा एकम निर्णय घेयला नको होता त्यात काही नियम व आटीचा समा लक्षवेश करून शाळा पंन्नास टक्के शाळा दोन सत्रात चालु ठेवायला हावेत.
:- रावसाहेब चव्हाण,शिक्षणतज्ञ. त-हाडी







