*मुक्त विद्यापीठ बी. एड्. परीक्षेत विनोद शिलवंत यांचे घवघवीत यश
दहिवडी प्रतिनिधी :
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक द्वारा आयोजित बी. एड्. प्रथम वर्ष परीक्षेत आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा या अभ्यास केंद्रांमधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरूपखनवाडीचे आदर्श शिक्षक विनोद शिलवंत यांनी ९८% गुण मिळवत तृतीय क्रमांकासह उज्वल यश संपादन केले. याबद्दल त्यांच्यावर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सुरुपखानवाडी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले विनोद शिलवंत हे उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जातात. कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये खंड पडू नये यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा त्यांनी प्रभावीपणे वापर केलेला आहे. तसेच लॉकडाऊन काळात वेळोवेळी गृहभेटी देऊन, दैनंदिन अभ्यासासाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे.
यापूर्वी मरगळवाडी सारख्या दुर्गम भागात त्यांनी केलेल्या विशेष शैक्षणिक कामाची दखल घेऊन सन २०१३ -१४ या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कारही त्यांना देण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत असतानाच स्वतःचीही शैक्षणिक पात्रता वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
विनोद शिलवंत यांना आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन साताराच्या प्राचार्या वंदना नलवडे, प्रा. धोंडगे सर, प्रा. खरात सर, प्रा. धनवडे सर, प्रा. मोरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विनोद शिलवंत यांना मिळालेल्या यशाबददल इचलकरंजीचे प्रांत विकास खरात, जतचे तहसीलदार जीवन बनसोडे, गटशिक्षणाधिकारी भरत चौगुले, विस्तार अधिकारी रमेश गंबरे, सोनाली विभुते, संगीता गायकवाड – जाधव, केंद्रप्रमुख नारायण आवळे, बाळासाहेब पवार, अशोक गंबरे, अंकुश शिंदे, शिक्षक बँकेचे संचालक आर. डी. खाडे सर, मा. व्हाईस चेअरमन कामिनी शिलवंत, जिल्हा परिषद शिक्षण समिती मा. सदस्य राजाराम तोरणे, माजी संचालक लक्ष्मण काळे, विजय शिंदे, संतोष घोडके, नंदकुमार तुपे, चंद्रकांत जाधव, महेश माने, काशिनाथ तोरणे, रोहिदास अहिवळे, कैलास तोरणे, प्रमोद मंगरुळे आदिंनी त्यांचे अभिनंदन केले.







