खिशात मोबाईलचा स्फोट, तरुण जखमी
कंपनीविरोधात पोलिसात तक्रार दाखल
आटपाड
आटपाडी ता आटपाडी येथील तरुणांच्या खिशामध्ये ठेवलेला फोन गरम होऊन स्फोट झाल्याने प्राण चव्हाण या तरुण जखमी झाला असून याबाबत त्याने आटपाडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
प्राण चव्हाण या तरुणाने जानेवारी 2021 मध्येच आपल्या मित्राच्या नावावर एका नामवंत कंपनीचा सुमारे तीस हजार रुपयांचा मोबाईल घेतला होता.
गेल्या वर्षभरापासून प्राण चव्हाण मोबाईल वापरत होता।दरम्यान बुधवारी साडे नऊ च्या सुमारास मित्रासोबत प्राण चव्हाण बोलत असताना अचानक पॅन्ट च्या खिशाला ठेवलेला मोबाईल गरम होत असल्याची जाणीव झाल्याने खिशातून मोबाईल काढत असतानाच अचानक मोबाईल चा स्फोट झाल्याने चव्हाण याच्या मांडिला गंभीर जखम झाली आहे
.यावेळी अचानक झालेल्या स्फोटाने सर्वजण भयभीत झाले.तर मोबाईल खिशात असताना झालेल्या स्फोटाने हादरून गेले, पायाच्या मांडीला व हाताला जखम झाल्याने प्राण चव्हाण ला सांगलीतीळ दवाखान्यात मित्रांच्या मदतीने दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची तब्बेत व्यवस्तीत आहे.
अन प्राणचे प्राण वाचले
दरम्यान प्राण चव्हाण याने बुधवारी रात्री आपला पॅन्ट च्या खिशात ठेवला होता.तोच जर मोबाईल शर्टच्या वरील खिशात ठेवला आसता अन स्फोट झाला असता तर मात्र अनर्थ घटना घडली असती.परिणामी मोबाईल कंपनी विरोधात दादा मागणार असल्याचे प्राण चव्हाण यांनी सांगितले.







