अजुन ही ग्रामीण भागाच्या खेडोपाडी जोपासली जाते–
रुखवदासाठी लागणारी पापड, लाडु ,तळण्याची पंरमपरा–
लग्न मुलींचे असो अथवा मुलांचे–
रुखवद व सुवासिनीनची ओटी भरण्यासाठी लाडु, पाड, कुरडया इत्यादी लागतात–
::::::::::::::::::::::::::::::::::::::
त-हाडी (प्रतिनिधी)
अनेक जुन्या रुढी परंपरा जरी मोडीत काढण्याचा विचार करीत असेल तरी देखील अजुन ही तो प्रेयत्न निश्चित अयशस्वी दिसतो आहे.
आजुन ही गावा गावातील जुने जाणते वयोवृद्ध गटातील जेष्ठ नागरी विविध सनावाराला लागरी आपल्या वडीलो पारजीत परंपरा कायम टिकून ठेवली आहे.
व आज रोजी चालू आहे.
तेव्हा दिवाळी, दसरा, दसअवतारी सोंग, होळी, नागपंचमी, गणपती उत्सव, दुर्गामाता उत्सव, आषाढी एकादशी,कार्तीकी एकादशी,पोळा, गोवर्धन पुजा,दुलीवंदन,मकर संक्रांत,पाडवा, श्रीकृष्ण आष्टमी,गौरीपुजन,यासह अनेक शुरविर, राष्ट्रीय पुरुषानच्या जयंती उत्सव व माझ्या मुस्लिम बांधवांनची रमाजान ईद,बकरी ईद, मोठ्या उत्साहात आजही ग्रामीण भागात परंपरागत पद्धतीने साजरी केली जातात तेव्हा.
त्यातच मानसाच्या आयुश्यातील एक आनंदाचा सोहळा म्हणजेच लग्नाचे रेषीम बंधन समारंभात हा सोहळा तर अजुन ही जुन्या रुढी परंपरा सांभाळून ग्रामीण भागातील नागरीकानी अविरथ पने चालु ठेवलीआहे.
याबाबत सविस्तर माहिती सांगा वयाची ठरली तर ती अशी आज ग्रामीण भागात लग्न गरीब वा श्रीमंत कुणाचेही असो व लग्न मुलांचे असो अथवा मुलींचे असो त्यात प्रामुख्याने आपल्या भावकीतील की ज्याला असल्ल ग्रामीण भागात भाऊबंद असे म्हटले जाते.
तेव्हा हिरव्या पाल्याच्या मांडवाच्या पुर्व संध्येला ज्याच्याकडे मुलांचे किंवा मुलींचे लग्न आहे.
अश्या कुटुंबातील वर,पिता किंवा वधु पिता यांचे भाऊबंद हळद कुंकू मिश्रीत केलेले तांदुळ, आपल्या आप्त इस्षट मित्र नातेवाईक परिवार, गावकरी यांना त्यांच्या घरोघरी जाऊन माडवाचे मुळ देऊन निमंत्रीत करतात.
मग सकाळीच सात ते सात तिस ते आठ वाजेपर्यंत मांडव,व मांडव झाल्यानंतर लगेचच सकाळी पारंपारिक पद्धतीने बेसन पोळीची न्याहरी सर्व समाज बांधवांना दिली जाते.
व नंतर गोधळीबुवा बोलावून गोंधळ,साजरा केला जातो व नंतर दिवसभर विविध कार्यक्रम होतात त्यात मग आडनावा प्रमाणे इर काढणे कपड्यांचेआहेर व नंतर देवदेऊक काढुन आप आपल्या अयपती प्रमाणे गावकरी मंडळी याना कुणी मिष्टान्न भोजन देतात तर वरण भात भाजी पोळी असं जेवण देतात परंतु हे सर्व काही करीत असतांनाच मात्र माता भगीनी मात्र हिरव्या पाल्याच्या मांडवाच्या पुर्व संध्येला आप आपल्या भाऊबंधातील प्रत्येक घरील किमान एक माता भगीनी लग्न घरी आप आपले परात ताड घेऊन येतात आणि मग लग्नात लागणा-या गव्हाच्या पिठाचे लाडू, त्याच प्रमाणे कुरडया पापड, तयार करून तेलात तळून काढतात व हे काम करीत असताना झोप लागु नये म्हणून गण, गौळण अभंग,भजन,भावगीत, भक्त गीत महाभारत, रामायण, गाऊन लाडु करण्याचें काम व कुरडया ,पापड लाडु, करण्याचें काम करतात कारण ह्मया तीन्ही गोष्टीला लग्न समारंभात फार महत्त्व आहे.
कारण लग्न मुलांचे असो किंवा मुलींचे मात्र मान ,पान सन्मान,करण्यासाठी व सुवाशीनी माता भगीनी यांची ओटी भरण्यासाठी हे पदार्थ अतिशय गरजेचे मानले जातात.
तेव्हा आजही ग्रामीण भागात अजुन ही जुन्या रुढी परंमपरा जिवंत ठेवण्यासाठी व त्यांची खरी खुरी जोपासना आजही होतांना दिसत आहे.
तेव्हा आपणास वरील छायाचित्रत सर्व महिला माता भगीनी एकत्र येन लाडु,व कुरडया, पापड, लाडु ,तळताना दिसत आहे.
तेव्हा एक जुनी म्हण आहे.
की जुन ते सोनं ही आज किती ही काळ बदलत चालेला जरी असला तरी खेडोपाडी आज जुनी रुढी परंपरा सांभाळून ग्रामीण भागातील असंख्य छोट्या-मोठ्या गावात जोपासली जाते आहे.
परंतु हे सर्व करताना सरकार माय बाप सरकारने जे काही नियम कोरोणा महामारी टाळण्यासाठी बांधुन दिलेले आहे.
ह्याचे अगदी काटेकोरपणे पालन करुन हे काम लग्न, सांस्कृतिक कार्यक्रम केले जाते आहे….







