• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

फरदड कापसाला देखील सोन्यासारखा भाव, मात्र फरदड उत्पादनामुळे होणार परिणाम

माणगंगा by माणगंगा
January 25, 2022
in महाराष्ट्र
0
फरदड कापसाला देखील सोन्यासारखा भाव, मात्र फरदड उत्पादनामुळे होणार परिणाम

फरदड कापसाला देखील सोन्यासारखा भाव, मात्र फरदड उत्पादनामुळे होणार परिणाम

त-हाडी प्रतिनिधी :

शिरपूर तालुक्यातील त-हाडी परिसरात या वर्षी कापसाच्या क्षेत्रात घट झाल्याचे सांगितले जात आहे, राज्यात देखील खान्देशात समवेतच मराठवाड्यात विदर्भ कापसाच्या क्षेत्रात घट झाली असून कापसाच्या क्षेत्रात झालेली लक्षणीय घट व अवकाळी पावसामुळे कापसावर आलेले रोगांचे सावट यामुळे कापसाच्या उत्पादनात यावर्षी घट झाली आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या मागणीने चांगलाच जोर पकडला आहे. त्यामुळे याचा परिणाम स्थानिक बाजारावर देखील पडत आहे. म्हणूनच कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव प्राप्त झाल्याचे चित्रे डोळ्याला नजरेस पडलेत.

यावर्षी हंगामाच्या कापसाला सुमारे दहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला होता. मध्यंतरी कापसाच्या बाजार भावात घसरण नोंदविण्यात आली होती मात्र नंतर भाव पुन्हा एकदा झळकताना नजरेस पडलेत.


यंदा खान्देशातील शिरपूर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील चांगला बाजारभाव प्राप्त झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी सुखावले आहेत.

तालुक्यात सध्या फरदड कापसाला देखील चांगला बाजारभाव मिळत असल्याने, तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हात खर्चासाठी पैसे उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांच्या मध्यात आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. मात्र असे असले तरी, कापसाचे फरदड उत्पादन घेतल्यामुळे कापसावर बोंड आळीचे सावट नजरेस पडते तसेच यामुळे पुढील हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकावर देखील बोंड आळी आक्रमण करू शकते, शिवाय यामुळे जमीन नापीक होण्याचा धोका हा कायम असतो त्यामुळे कपाशीचे फरदड टाळावे असा सल्ला कृषी वैज्ञानिक देत असतात.

कापसाच्या पिकाला गेल्या अनेक वर्षापासून बाजारपेठेत चांगला दर प्राप्त होत नव्हता, तसेच कापसाचे पीक हे खूप खर्चिक असते या पिकासाठी मजुरांची देखील जास्त आवश्यकता भासत असते, त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी या वर्षी कापूस पिकाला फाटा देत कांदा, पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. परिणामी कापसाच्या क्षेत्रात तालुक्यात लक्षणीय घट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अशीच काहीशी परिस्थिती संपूर्ण राज्यात बघायला मिळाली त्यामुळे कापसाच्या उत्पादनात घट नमुद करण्यात आली. तसेच यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मोठी मागणी असल्याने कापसाला चांगला बाजारभाव प्राप्त झाला. यावर्षी कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव प्राप्त होत आहे, कापसाला गेल्या अनेक वर्षापासून पाच हजार रुपये पर्यंतचा बाजार भाव मिळत असे, परंतु यावर्षी बाजार भावात विक्रमी वाढ बघायला मिळत आहे.


फरदड कापसाला देखील या वर्षी आठ ते नऊ हजार रुपया पर्यंत बाजार भाव प्राप्त होत आहे. मात्र असे असले तरी, फरदड उत्पादनामुळे आगामी हंगामात बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असल्याने शिवाय यामुळे जमीन नापीक होत असल्याने कृषी विभागाने डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कापसाचे पीक उपटण्याचा सल्ला दिला आहे.
तसेच कापूस उत्पादक शेतकरी यांच्या मते, फरदड कापसाचे वजन देखील कमी होत असते त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाच्या फरदड उत्पादनाच्या मोहोजाळ्यात अडकून न पडता कापूस पिक नष्ट करावे आणि इतर पिकांची लागवड करावी.

Views: 467
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी ६ सराईत आरोपींना अटक करत २४ गुन्हे आणले उघडकीस

कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी ६ सराईत आरोपींना अटक करत २४ गुन्हे आणले उघडकीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)