त-हाडी प्रतिनिधी
आर.सी.पटेल माध्य.व माध्यमिक विद्यालय टेकवाडे येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आली 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजन विद्यालयातील मतदार साक्षरता मंच व राष्ट्रीय सेवा योजना एकक च्या माध्यमातून घेण्यात आला
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री.के आर जोशी सर होते. भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिन 25जानेवारी1950हा दिवस भारतात 2011पासून’ राष्ट्रीय मतदार दिवस’ म्हणून देशभर मतदार गौरव दिन म्हणून साजरा केला जातो या वर्षाचा बोध विधान “सक्षम, जागरूक, सुरक्षित आणि माहितगार मतदार” हे आहे.याचे महत्व व
मतदार म्हणून आपली काय कर्तव्य असतात याची जाणिव विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी श्री. एस.एम.पाटील यांनी आपल्या मार्गदर्शन विचारात करून दिली.
प्राचार्य जोशी यांनी मतदान आणि मतदार यांचे महत्व देश विकासात मोठे कार्य आहे या कर्तव्याचे पालन प्रत्येक मतदाराने केले पाहिजे असे आव्हान केले. कार्यक्रमात एन एस एस स्वयंसेवकांनी घोषवाक्य तयार केली व आपला सहभाग नोंदवला , श्री.जी.पी.पटेल,श्रीमती एस. एल भोगे श्रीमती पाटकर उपस्थित होते .श्री ए.एस. पाडवी यांनी सूत्रसंचालन व आभार श्री जे.व्ही पाटील यांनी मानले कार्यक्रमाला व शिक्षकवृंद उपस्थित होते







