आटपाडी तालुक्यातील देवस्थानच्या जमिनी पूर्वरत देवस्थानच्या नावे करा -तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील देवस्थान जमीनचा शोध धेऊन ७ / १२ पत्रकावरील मालकी वहिवाट दारांची नांवे कमी करणे बाबत मनसेचे तालुका कृषी अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन द्वारा केले आहे.
राज्यशासनाने राज्यातील देवस्थानाच्या जमीनीची तपासणी आणि जमीनीचे बेकायदेशीर हस्तांतरण झाले असल्यास त्या पूर्ववत देवस्थानच्या नांवे करण्यावावत आदेश दिले आहेत. तरी या अनुषंगाने आटपाड़ी तालूक्यातील शेकडो हेक्टर जमीनी या देवस्थान इनामाच्याआहेत .जवळपास तालुक्यातील प्रत्येक गावात देवस्थानच्या जमीनी आहे या जमीनी वर्षानुवर्षे वहिवाटदार कसत आहेत.
याजमीनीच्या ७ /१२ पत्रकांत वहिवाट दाराच्या नांवे मालक या सदरात नोंद आहेत. यामुळे हया जमीनी देवस्थानच्या असून ७ /१२ पत्रकानुसार त्यांची मालकी वहिवाट दार असल्याचे दिसते . परंतु मागील काही वर्षात त्यातील देवस्थानच्या जमीनी या मालकी वहिवाट दारांनी विकी केल्याचे निदर्शनास येते.म्हणून आपण आटपाडी तालुक्यातील सर्व इनामी जमीनीचा शोध घेऊन या ७ /१२ पत्रकावरील मालकी वहीवाट दाराची नांवे लवकरात लवकर कमी करण्याचे आदेश आटपाडी तहसीलदार यांना दयावेत व तहसीलदाराकडून ते आदेश सर्व तलाठयांना दयावेत.
अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दहा दिवसाच्या मुदर्तीत हे न झाल्यास तहसील यांचा निषेध करण्यात येईल त्यास प्रशासन जवाबदार राहील . असे निवेदनात म्हटले आहे.
सदर माहितीसाठी प्रत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , महसूलमंत्री ,पोलीस प्रमुख साहेव विश्रामबाग सांगली,तहसीलदार साहेबआटपाडी,पोलीस निरीक्षक आटपाडी यांना देणार आले आहे.







