आर. सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टेकवाडे येथे 73 वा प्रजासत्ताक दिवस साजरा
त-हाडी दिनांक 26 जानेवारी रोजी आर. सी. पटेल माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, टेकवाडे येथे 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री. के. आर. जोशी सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच प्रजासत्ताक दिनाचे महत्व ग्रामस्थांना सांगितले व विद्यार्थी उपस्थिती कशी वाढेल त्या बदल ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली.
यावेळी गावातील सरपंच उपसरपंच माजी सरपंच पोलिस पाटील प्रतिष्ठित नागरिक नि पदाधिकारी उपस्थित होते उपस्थित ग्रामस्थांनी चांगलाच प्रतिसाद देत विद्यालयातील विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचे आश्वासन दिले. सदर कार्यक्रमाला विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. के. बी. चौधरी सर राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्राध्यापक श्री. एस. एम. पाटील विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री. जी. पी. पटेल, डी. बी तडवी, एस. एल. भोगे मॅडम, एम आर. पाटकर मॅडम, एम. व्ही. चव्हाण मॅडम प्रा.जे. व्ही. पाटील प्रा. ए. एस.पाडवी, आर. एस. वळवी, आर. एच. भलकार, यु. आर. सोनार, आर. आर. गोपाल, वाय. बी. कुमावत, आर. डी. ठाकरे, एस. बी. वळवी व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.







