• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

महावितरणने वीजपुरवठा खंडीत केल्यामुळे पिके करपली..शेतकरी त्रस्त चुकीच्या बिल आकारणीने थकबाकीदारांचा आकडा फुगला..

माणगंगा by माणगंगा
January 30, 2022
in सांगली
0
महावितरणने वीजपुरवठा खंडीत केल्यामुळे पिके करपली..शेतकरी त्रस्त चुकीच्या बिल आकारणीने थकबाकीदारांचा आकडा फुगला..

महावितरणने वीजपुरवठा खंडीत केल्यामुळे पिके करपली..शेतकरी त्रस्त चुकीच्या बिल आकारणीने थकबाकीदारांचा आकडा फुगला..

आटपाडी तालुक्यांमध्ये महावितणने ट्रांसफार्मर बंद करण्याचा सपाटा लावला आहे .त्यामुळे ेतकऱ्यांना पिकाला पाणी देणे मुश्कील झाले आहे. अनेकांची पिके पण्याविना जळाली आहेत, तर अनेक ठिकाणी पिके करपू लागली आहेत . तालुक्यात सर्वच भागात टेंभू योजनेचे पाणी आले नाही. तर पाऊसकाळ वेळेवळ नसल्याने अनेक गावात सततचा दुष्काळ आहे .त्यामध्ये महावितरणने ट्रांसफार्मर बंद करण्याचा सपाटा लावला असल्याने शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. महावितरणने अनेक वर्षापासून चुकीचे बिल आकारणी केली आहे.मोटारी बंद असल्यातरी बिल मात्र अंदाचे दिले जाते. मीटर प्रमाणे बिल आकारणी केली नसल्यामुळे थकबाकीदारांचा आकडा फुगत चालला आहे.

मीटरप्रमाणे बिले दिली असती तर शेतकऱ्यांनी -त्याचवेळी भरली असती, परंतु बील आकारणी साठी मीटरचा वापर केला नाही .अंदाजे बिले दिल्यामुळे थकबाकीदारांच्या आकडा वाढत चालला आहे. ट्रांसफार्मरचा वीज खंडित केल्यामुळे फळ बागांना पाणी नसल्याने बागेवर भयंकर परिणाम झाला आहे. सध्या शेतकरी फळबाग पिकाकडे वळला असून त्यामध्ये द्राक्ष ,डाळिंब,आंबा,भाजीपाला व इतर मार्केटिंग ची पिके शेतकरी घेऊ लागला आहे. परंतु महावितरणच्या कारभाराने शेतकरी भिकेला लागण्याची शक्यता आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे.

त्यामुळे पिकांना पाण्याची गरज आहे. असे असताना सुद्धा महावितरणने वीज कनेक्शन तोडण्याचा सपाटा सुरू केला आहे. कनेक्शन तोडणे आगोदर शेतकऱ्यांना कोणतीही कल्पना दिली जात नाही. अचानकपणे ट्रांसफार्मर बंद केल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज काढून फळबागेची लागन केली आहे. वीज कनेक्शन अचानक तोडल्यामुळे फळबागांना पाणी द्यायचे कसे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे .
वीज कनेक्शन तोडल्याने पिकांचे बागांचे नुकसान होऊ लागले आहे. शेतीतून उत्पादन निघेना तर पुन्हा शेतकरी थकबाकीत जाऊन कर्जबाजारी होऊ शकतो, ज्यांची कनेक्शन थकबाकीत आहेत, ज्या शेतकऱ्यांना अंदाजे बिले दिली आहेत, अशा शेतकऱ्यांना मीटरप्रमाणे बिले देऊन िलामध्ये हप्ते पाडून द्यावेत अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे. ———————–
*बोगस बिले माथी मारली* अनेक ठिकाणी पाणी नसल्याने विद्युत पंप बंद आहेत, अनेक ठिकाणी मीटर प्रमाणे बिले दिली गेली नाहीत, अंदाज बिले दिल्यामुळे थकबाकीदारांचा आकडा फुगत गेला आहे. जिथे पाणी नाही तिथे अनेक शेतकऱ्यांनी विद्युत पंप सुरूच केले नाहीत, तरीसुद्धा त्यांच्या माथी अंदाजपंचे बिले महावितरणने मारली आहेत.
———————-
*सूचना न देता ट्रांसफार्मर बंद केले* महावितरणने ट्रांसफार्मर बंद केले. ट्रांसफार्मर बंद करण्या अगोदर पंधरा दिवस अगोदर शेतकऱ्यांना रीतसर नोटीशीद्वारे कळवायला हवे होते असे न करताच अचानकपणे ट्रान्सफार्मर बंद केल्यामुळे पिके जळू लागली आहेत. त्यामुळे पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होण्याचे चित्र निर्माण झाले आहे.
—–—————-
*करोडो रुपयाचे नुकसान* महावितरणने अचानकपणे कनेक्शन तोडल्याने शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान होत आहे .पिके सुकू लागली आहेत, वाळू लागली आहेत, एकतर फळबाग लागवडीसाठी किंवा अन्य पिकांसाठी शेतकऱ्यांनी विकास सोसायटी व नॅशनल बँक ,पतसंस्था यांचे कर्ज काढून शेतीमध्ये खर्च केलेला आहे. आणि जर वीज कनेक्शन तोडल्यामुळे पिके जळाली तर पुन्हा शेतकरी कर्जाच्या खाईत जाणार याला सर्वस्वी महावितरण कंपनी जबाबदार असणार आहे.
———————
*महावीतरणशी संपर्क साधला असता माहिती मिळाली नाही* तालुक्यातील किती थकबाकीदार शेतकरी आहेत,किती शेतकऱ्यांची कनेक्शन तोडली,किती ट्रान्सफार्मर बंद केले याची माहिती घेण्यासाठी आटपाडी कार्यालयाशी संपर्क साधला असता माहिती मिळाली नाही.

Views: 327
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
राष्ट्रपिता महात्मा*मोहनदास करमचंद गांधी

राष्ट्रपिता महात्मा*
मोहनदास करमचंद गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)