सोसायटीच्या कर्जासाठी शेतकऱ्यांचे जिल्हा बँकेच्या दारात धरणे आंदोलन
युवा नेते नाथा पाटील व विक्रम ढोणे
माणगंगा न्यूज पोर्टल जत
.(पिकांसाठीची कर्जमर्यादा)मंजूर असलेल्या सभासदांना त्वरित कर्ज वाटप करावे.यासाठी जत तालुका जिल्हा बँकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी विकास सोसायटीच्या सचिवांना व बँक अधिकारी यांना सूचना करून सभासदांना कर्ज वाटप करावे. अन्यथा गुरुवार दि.१० फेब्रुवारी रोजी जत येथील बाजार समितीच्या जिल्हा बँकेच्या कार्यालयासमोर सभासद व शेतकऱ्यांना सोबत घेऊन धरणे आंदोलन करण्याचा इशारा युवा नेते नाथा पाटील व सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की,जत तालुक्यातील विकास सोसायटीना जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांना शेती कर्ज दिले जाते. परंतु सध्या विकास सोसायटीच्या नवीन सभासदांना कर्ज वाटप करण्यास टाळाटाळ केली जात आहे नवीन सभासदांनी कर्ज मागणी करून सुद्धा गेले वर्ष गेले तरी त्यांना क.म.(पिकासाठीची कर्ज मर्यादा)मंजूर करण्यास सहा महिने घालवले.आता क.म.मंजूर होऊन आले देखील एप्रिल-मे महिन्यामध्ये कर्ज वाटप करू असे सांगून टाळाटाळ केली जाते.
तरी तालुक्यातील शेतकरी सभासदांचा सहानुभूतीने विचार करून आठ दिवसांत क.म.मंजूर असलेल्या सभासदांना त्वरित कर्ज वाटप करण्याबाबत सोसायटीच्या सचिवांना व बँक अधिकारी यांना सूचना करून सभासदांना कर्ज वाटप करावे अन्यथा गुरुवार दि.१० फेब्रुवारी रोजी जत येथील बाजार समितीच्या जिल्हा बँकेच्या कार्यालयासमोर सभासद व शेतकऱ्यांना सोबत घेऊन धरणे आंदोलन करण्याचा इशारा पाटील व ढोणे यांनी दिला आहे. हे निवेदन तहसीलदार व जत पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.







