आर.सी.पटेल माध्य.व उच्च माध्य.विद्यालय,भोरखेडा येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा
त-हाडी
19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा रयतेचा राजा म्हणून त्यांच्या आदर्श कार्याची शिकवण आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षणाच्या माध्यमातून दिली जात आहे, धर्माचा आदर,नारीशक्तीचा सन्मान, राष्ट्र सुरक्षा व विकास ही कार्यात्मक शिकवण त्यांनी दिली असे विचार प्राचार्य श्री.आर.एफ.शिरसाठ सर यांनी व्यक्त केले. विध्यार्थीनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवजन्मोत्सव कार्यक्रमाची सुरवात झाली.छत्रपती शिवाजी महाराजांची भुराजनीती किती वैशिष्ट्य पूर्ण होती की ज्यामुळे संख्येने मोठ्या शत्रू सेनेचा पराभव करून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार केले, विज्ञान दृष्टिकोन ठेवून त्यांनी स्वराज्याचे व्यवस्थापन केले असे विचार श्री एन वाय बोरसे यांनी मांडले यावेळी पर्यवेक्षक श्री पी व्ही पाटील ,श्री एस एम पाटील,श्री व्ही एस ईशी,श्री एस आर देसले श्री पी टी चौधरी श्री व्ही डी पाटील श्री आर जी पाटील श्री एस एन पाटील ,व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता







