पळसाच्या पानाच्या पत्रावळी लुप्त होण्याच्या मार्गावर _ आतापर्यंत चालत आलेली परंपरा मोडीत निघणार
______________________________
त-हाडी प्रतिनिधी–
— अलीकडे पळसाच्या पानाच्या पत्रावळी ऐवजी सर्रास थर्माकोल व खाजगी पत्रवाळी चा वापर अधिक होत असल्याने पानाच्या पत्रावळी व द्रोण लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
धार्मिक कार्यक्रमात जेवणावळीसाठी ग्रामीण भागात एखाद्या घरी लग्न ,मोठे समारंभ असले की त्यामुळे पत्रारावळी अनेक नागरिक कोणताही मोबदला न घेता जंगलात जाऊन पळसाच्या पाणे, कुडा,झाडाची पाणे तोडून आणून सायंकाळी चौकात दहा ते वीस नागरिक एकत्र बसून गमती जमतीत पत्रवाळी तयार करून घेत होते. ज्यामुळे ज्यांच्याकडे कार्यक्रम आहेअशांना मोठा दिलासा मिळत होता .
परंतु दिवसेंदिवस सेवाभाव समाजातून कमी होत चालला आहे.
व कोराणा संसर्गामुळे सर्व समारंभ बंद आहे.
सर्व बंद आहे .याचाही फटका सामान्याला बसत आहे . कुटुंब लग्न समारंभ काळात या कामातून चार पैसे कमवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते .
अश्या अनेक गावांतील कुटुंबावर आता उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे .
हा घरगुती लघुउद्योग राहत होता .घरातील सर्व मंडळी पानाच्या पत्रावळी तयार करण्यास मदत करीत होते. मात्र आता सर्रास प्लॅस्टिक, स्टील ,थर्मकोल ,ताटांनी त्याचा जागा घेतली आहे.
त्यामुळे पानाच्या पत्रावळ्या दिसेनाशी झाली आहे . प्लास्टिक पत्रावळी व द्रोणाचे विघटन होत नसल्याने पर्यावरणाचा र्हास होतोय ,त्यामुळे काही नागरिकाकडूनत्या ऐवजी कागदी पत्रावळी व द्रोण वापरल्यामुळे कल असल्याचे दिसून येत आहे .काळानुसार हे बदल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे .
त्यामुळे प्लास्टिक बंदी ठरते कुचकामी ठरताना दिसत आहेत कारण माय बाप शासनाने सन २०१८ पासून शासनाने यावर बंदी घातल्यावर ही पुन्हा पारंपारिक व आरोग्यवर्धक पानाच्या पञवाळीला चांगले दिवस येतील ,
असे वाटू लागले होते .परंतु शासनाचा कागदपत्री बंदीचा यावर कोणताही परिणाम झाला नाही अजूनही ग्रामीण भागात घरगुती कार्यक्रमात पळसाच्या पानाच्या पत्रावळीत देवाला नैवेद्य मांडला जाते .पानाच्या पत्रवाळीमुळे भोजन वळीची राग शोभून दिसत आहे .
एवढं नाही तर अनेक धार्मिक कार्यक्रमात व म्हणजेच पितृपक्ष पंधर वाड्यात आज ही पळसाच्या पानांच्या पत्रावाळीवरच नैवेद्य दाखवतात व विविध धार्मिक कार्यक्रमात देखील पुजा अर्चना विधीसाठी आज राणा वनातुन पळसाची पाने शोधून पत्रावळी तयार केले जाते व त्यावर पुजा मांडली जाते .







