वाहनांच्या गर्दीत कोंडला महसुलाचा श्वास,
वाहनांच्या गरड्याने तालुक्यातून विविध कामासाठी येणाऱ्या लोकांची गैरसोय
आटपाडी तहसील कार्यालयाच्या आवारात बेकायदेशीर वाहतूक करणारी जप्त केलेल्या वाहनांची गर्दी झाली असून वाहनाचा खच साचला आहे. याकडे महसूल विभागाने मात्र डोळे झाक केली आहे.
तालुक्यातून विविध कामासाठी नागरिक येत या कार्यालयात सातत्याने लोकांची गर्दी असते या कार्यालयात येणाऱ्या लोकांना या वाहणापासून त्रास सहन करावा लागत आहे. या वाहनांच्या गर्दी मुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शिवाय लोकांना ये -जा करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. तसेच अनेक वाहनांना गंज चढू लागला आहे, तरी सुद्धा या वाहनांचा लिलावा का निघू शकला नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे.
शासनाने प्रशस्त अशी सुसज्ज प्रशासकीय इमारत बांधली आहे, परंतु या इमारतीच्या आवारात या जप्त केलेल्या वाहनांमुळे कार्यालयास अवकळा आली आहे.
मागील दोन महिन्यांपूर्वी तहसीलदार बाई माने यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते की जप्त केलेल्या वाहनांचा लिलावा लवकरच काढणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते परंतु अद्याप एकाही वाहनांचा लिलावा काढला नाही त्यामुळे महसूल विभाग व इतर कार्यालये वाहनांच्या गराड्यात असल्याचे चित्र दिसून येत आहे
तालुक्यातून प्रत्येक गावातून येणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे त्यामुळे प्रशासकीय इमारतीच्या समोरील वाहने इतर जागेत हलवावीत व प्रशासकीय इमारतीच्या समोरील आवार मोकळा करावा अशी नागरिकांमधुन मागणी होतआहे.
अनेक दिवसांपासून जप्त केलेली वाहने एकाच जागेवर असल्याने वाहनांच्या अवतीभोवती घाणीचे साम्राज्य पसरले आहे







