शेतकऱ्याचा मुलगा सत्तेत बसेपर्यंत शेतकऱ्यांच्या नशिबी हालच- ह-भ-प तुळशीदास महाराज देवकर
गंगाखेड -प्रतिनिधी
शेतकऱ्याचा मुलगा जोपर्यंत महाराष्ट्र आणि केंद्रात सत्तेत बसत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या नशिबी हालच राहणार आहेत. आगामी काळात शेतकऱ्यांनी आपल्या हितासाठी जागरूक राहव असं आवाहन देवईमाय संस्थानचे मठाधिपती ह-भ-प तुळशीदास महाराज देवकर यांनी गंगाखेड गुरुवारी तहसील कार्यालयासमोर आंदोलन स्थळी बोलताना व्यक्त केल.
डोंगरी जन परिषदेचे प्रणेते पंडितराव घरजाळे यांच्या नेतृत्वाखाली मागील दहा दिवसापासून पिक विमा, दुष्काळी अनुदान मिळावे या मागण्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे .या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्याच्या निमित्ताने परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ यांच्या संकल्पनेतून याठिकाणी एक दिवशी कीर्तन संपन्न झाले.
पुढे बोलताना तुळशीदास महाराज म्हणाले की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. पृथ्वीवरील एकमेव शेतकरी हाच असा व्यक्ती आहे जो की दुसऱ्यासाठी जगतो. शेतकऱ्यांनी जर स्वतःसाठीच धान्य पिकवायचचे ठरवलं तर या सरकारला शेतकर्यांसमोर झुकावे लागेल. सरकारने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा अंत न पाहता माय बाप म्हणून समोर येत या शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे आवाहनही त्यांनी केले. आणि सरकार जर शेतकऱ्याकडे लक्ष देत नसेल तर इथून पुढे शेतकरीही सरकारचा डाव लक्षात ठेवतील असेही ते म्हणाले. शेतकऱ्याचा मुलगा जोपर्यंत महाराष्ट्राच्या गादीवर बसणार नाही
तोपर्यंत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होणार नसल्याची महाराजांनी सांगितले. महाराजांचे स्वागत तुळसिदास काका नीरस, नागनाथ नीरज सर ,सतीश शिंदे नारायण सरोदे आदींनी केले. यावेळी डोंगरी परिषदेचे प्रणेते पंडितराव घरजाळे यांचाही सत्कार करण्यात आला. शिवाजी दगडे, भगवानराव शिंदे ,त्रिंबक मुरकुटे, वैजनाथराव चाटे, माऊली व्हावले, बंडू सोळंके आदीसह मान्यवर उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या उपोषणात आपला लेखी पाठिंबा जाहीर केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रम बाबा इमडे, वाघलगाव चे माजी सरपंच नारायण घनवटे,हरंगुळ चे सरपंच बीबन पठान, मुंजाभाऊ लांडे, रामेश्वर भोळे, रोहिदास निरस ,भगवान कातकडे जयवंत कुंडगीर आदींनी प्रयत्न केले.







