वाघडू ता चाळीसगाव जामडी येथील शेतकरी असलेल्या पित्याला अचानक अर्धावायूचा झटका आला होता मात्र धाडसी आरतीने घाबरून न जाता मोटरसायकलवर पित्यास बसवून आईला पाठीमागून घट्ट पकडायला लावले गौताळ घाटा सारखा खडतर प्रवास करत आरतीने १ooकिमी अंतर पार केले आणि औरंगाबादमधील रुग्णालयात दाखल केले
आरतीने वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वडिलांचा प्राण वाचवला आरतीच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे जामडी येथील शेतकरी संजय परदेशी यांना दोन मुली आहेत मोठ्या मुलीचे लग्न झालेल्या आहे यामुळे घरात आता परदेशी त्यांची पत्नी व मुलगी हे तिघे राहतात आरती १२ वी सायन्स शिकत आहे
चार दिवसापूर्वी संजय परदेशी यांना अर्धांगवायूचा झटका आला यामुळे त्यांची पत्नी व मुलगी ये काळजीत पडले त्यांना तात्काळ रुग्णालयात नेणे गरजेचे असल्यामने तसेच वाहनांची व्यवस्था नसल्याने आरतीने मोटरसायकलवर वडिलांना रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला तिने तातडीने वडिलांना मोटरसायकलवर बसवून पाठीमागे आईला पप्पांना घट्ट धरून बसण्यास सांगितले आणि औरंगाबाद कडे प्रवास सुरु केला जामडी पासून औरंगाबाद चे अंतर हे तब्बल शंभर किलोमीटर व आठ किलोमीटर अंतर असलेला गौताळा घाटतील ट्रिपल सीट प्रवास अत्यंत धोकादायक होता
तरीही न डगमगता तिने वडिलांना सुखरूप रुग्णालयात आणले अशात आजारी वडिलांसह तीन शीट प्रवास सोपा नव्हता मात्र आरतीने हिंमत न हारता साडेतीन तासात औरंगाबाद गाठलं खाजगी रुग्णालयात वडिलांना दाखल केले वेळेवर उपचार मिळाल्याने वडिलांचा जीव वाचल्याचे डॉक्टरांनी सांगितले आरतीने दाखविलेल्या धाडसाबद्दल







