महिला दिन काय असतो हो भाऊ…..!
ग्रामिण भागातिल महिलांचे वास्तव गंभीर…..
●त-हाडी प्रतिनिधी ●
ललिता खोंडे
!!जागतिक महिला दिन विशेष!!
उन्हाळ्यात तापमानाचा पारा वर चढत असताना पोटाची खळगी भरण्यासाठी घिसडी समाजाच्या महिलाणा भर उन्हात लोखंडावर घन मारावा लागत असुन तापमानाचा पारा अणि तो काय असतो..? असा प्रश्न त्याच्याकडून येतो तेव्हा टीचभर फोटापुढे साक्षात सूर्याची उष्णता देखिल कमी वाटते
प्रतिनिधीनी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा समोर आले विदारक आणि विचार करायला लावणारे सत्य शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथिल घिसडी समाजाच्या महिला मंगलबाई , सविताबाई ,सुरेखाबाई,यांना काय ताई आज जागतिक महिला दिन आहे
आज खास तुमचा दिवस जगभर साजरा होणार तुम्हाला शुभेच्छा ताई अस काहीस मि त्या दोन महिलांना म्हणाल्या ,त्यावर ति महिला कावर्या बावर्या नजरेणे माझ्याकडे बघत म्हणाली तो महिला दिन काय असतो भाऊ… व तो का साजरा केला जातो… काही सरकारची स्किम आहे का काही पैसै बियसे मिळतात काय.. अशा अनेक प्रश्नांनि बाईने मला पुरत हैराण केल होत यावर प्रश्न थांबेल त्या महिलेचे तर ति महिला कसली पुढ तिन आम्हाला दिस दिस भाकर भेटत नाही भाऊ खायाले ईकडुन तिकडून कसीबसी मागुन आणलेली भाकर खाऊन दिवस काढुण राहायलो आम्ही आम्हाला कसला महिला दिन…. तिच्या या शेवटच्या प्रशनान मात्र महिला सक्षम झाली असे सांगून मोकळे होणाऱ्याच्या डोळ्यात झणझणीत तेल घालणारे सध्या वास्तव आहे.
सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर असली तरी मात्र मजुर म्हणून काम करणाऱ्या महिलेचे हाल काही संपलेले दिसुन येत नाही
विटभटी कामगार, ऊसतोड कामगार, शेतातील मजुर महिलांचे प्रश्न काही अजून कायम आहे. कामावर पुरुषाला जास्त आणि महिलाना आजही कमी मजुरी भेटत आहे .
या अशा अनेक अडचणींना सामना करत मजुर महिला ठाम उभी आहे.
चौकट…..
घिसडी समाजातिल महिलांचा सवाल…..
शेतकऱ्यांना मानधन सुरु केल आम्हाला केव्हा करणार….
सरकारणे शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या शेतकऱ्यांना आता 6 हजार मानधन हि सुरु केले पण आमचा पोट भरण्याचा प्रश्न कायम ठेवलाय आमच मरण तर रोजच आहे भाकरीसाठी तडफडतोय बाकी काय आम्हाला अजून घरकूल मिळाले नाही अशी काळजाला भिडणारी व्यथा मंगलबाई दिगाभर पंचाळ,(60) सविता पडीत पंचाळ (35 )सुरेखा विनोद पंचाळ(30 )या तीन महिलानी प्रतिनिधी शी पत्रकारांसमोर माडंली ..
:-फोटो:-
भर उन्हात पोटासाठी घाम गाळत काम करताना घिसडी समाजातिल महिला… (छाया-ललिता खोंडे)