• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

शेखसाहेब म्हणजे आटपाडी तालुक्याच्या चौफेर विकासासाठी जीवन समर्पित करणारे नेते ! युवा नेते सुहास बाबर

माणगंगा by माणगंगा
March 17, 2022
in सांगली
0
शेखसाहेब म्हणजे आटपाडी तालुक्याच्या चौफेर विकासासाठी जीवन समर्पित करणारे नेते ! युवा नेते सुहास बाबर

जेष्ठ पत्रकार सादिक खाटीक यांचा लेख

शेखसाहेब म्हणजे आटपाडी तालुक्याच्या चौफेर विकासासाठी जीवन समर्पित करणारे नेते !

सुहास बाबर यांचे उदगार .

_______________
आटपाडी दि . १६ (प्रतिनिधी )


अँडव्होकेट उस्मान नबी शेखसाहेब म्हणजे आटपाडी तालुक्याच्या चौफेर विकासासाठी जीवन समर्पित करणारे नेते होते असे उदगार सांगली जि . प . चे माजी उपाध्यक्ष सुहासभैय्या बाबर यांनी घरनिकी येथे बोलताना काढले .
आटपाडी तालुक्याचे नेते, पंचायत समितीचे माजी सभापती दिवंगत नेते उस्मान नबी शेख साहेबांच्या प्रथम पुण्यस्मरण दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात सुहासभैय्या बाबर बोलत होते .


राष्ट्रवादी काँग्रेसचे खानापूर आटपाडी मतदार संघाचे माजी अध्यक्ष आनंदराव बापू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, लेंगरे जि.प . गटाचे माजी जि . प . सदस्य फिरोजभैय्या शेख, राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस विजयराव पुजारी, झरे गावचे शिवसेना नेते रमेश उर्फ बंडुशेठ कातूरे, घरनिकीचे ज्येष्ट नेते नारायणदादा पवार, सरपंच विक्रमभाऊ दाईंगडे, माजी सरपंच सलीमभाई शेख, आबीदभाई शेख, टी.के. वाघमोरे,लालासाहेब तोरणे , शहाजीबापू पवार, शिवाजी येळे, यशवंतराव सुळे , प्रकाशबापू मेटकरी, ईश्वरनाना पवार, पडळकर गुरूजी, विकी बेरगळ, बबनशेठ बेरगळ, इलाई शेख, पोलीस पाटील हमीद शेख,शशिकांत कदम,भीमराव कदम, सुनिल कदम, बंडोपंत पवार , जावेद काझी, प्रकाशबापू जाधव, फरहान शेख, सनी शेख, सैफ शेख, ग्रामसेवक इत्यादी मान्यवर उपस्थित होते .


सध्याच्या हिंदू मुस्लीम ध्रुवीकरणाच्या वातावरणाचा विचार करता ६ दशके सर्वच समाजासाठी राबणारे शेखसाहेब आणि त्यांचेवर प्रेम करणारे सर्वधर्मीय जाती जमातीचे लोक हे नाते खऱ्या भारतीयत्वाचे होते . शेख साहेबांचे चांगले गुण प्रत्येकाने आत्मसात करून त्यानुसार वाटचाल केली पाहीजे . हेच खरे त्यांचे पुण्यस्मरण ठरणार असल्याचे सुहासभैय्या बाबर यांनी स्पष्ट केले .


आटपाडी तालुक्याच्या सर्वच क्षेत्रात हिरीरीने सहभागी होणाऱ्या शेखसाहेबांनी धर्मातीत केलेले काम उच्च कोटीचे होते . क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी, डॉ भारत पाटणकर यांच्या नेतृत्वा खालील पाणी चळवळीच्या लढ्यात शेख साहेबांनी दिलेले योगदान पिढ्यान पिढ्या स्मरले जाईल . आमच्या सारख्यांचे मार्गदर्शक, पितृतुल्य नेते म्हणूनच आम्हांला शेखसाहेब वंदनीय होते . असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पाणी चळवळीचे प्रणेते आनंदरावबापू पाटील यांनी यावेळी व्यक्त केले .


उच्च विद्याविभूषीत आणि सधन, सुसंस्कारी कुटुंबातल्या शेख साहेबांचे कार्य – कर्तृत्व आमदार,नामदार होण्याच्या उंचीचे होते . ते मुंबईत राहीले असते मोठे नेते म्हणून राज्यभर गाजले असते . आपल्या भागाकडे, त्यांचे अल्पसंख्य असणे हा त्यांच्या राज्यस्तरीय नेतृत्व भरारीला मोठा अडसर ठरला

. शेख साहेबांसारख्या कर्तृत्वसंपन्न, चौफेर व्यक्तीमत्वाच्या नेत्यांना विधीमंडळ, संसदेत विनासायास जाता यावे म्हणून एस .सी .,एस . टी . सारखे सर्वच ठिकाणी अल्पसंख्यांक म्हणून राजकीय, शैक्षणीक आरक्षण मिळणे गरजेचे आहे . अपवादात्मक ठिकाणीच अल्पसंख्याक नेतृत्वाला आमदार, खासदार, नामदार होता आले. हे जरी खरे असले तरी देशातील ,राज्यातील हजारो कर्तृत्व संपन्न शेख साहेब नेहमीच उपेक्षित राहीले याची खंत आहे . स्थानिक स्वराज्य संख्यापासून विधीमंडळ संसदेपर्यत सर्वच ठिकाणी अल्प संख्याकांना आरक्षण मिळणे हेच न्यायाचे होणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी व्यक्त केले .


कृष्णामाईचे पाणी तालुक्यात यावे यासाठी क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी, डॉ. भारत पाटणकर यांच्या चळवळीत झोकून देणारे, विविध नेत्यांकडे पिच्छा पुरविणारे आणि प्रत्यक्षात पाणी आल्यानंतर कृष्णाआई – कृष्णा माँ च्या स्वागतासाठी लहान मुलासारखे रडणारे शेखसाहेब, आटपाडी तालुक्याच्या विकासासाठी आयुष्य खर्ची घालणारे खरे नेते होते . असे ही सादिक खाटीक यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले .


यावेळी शालेय विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते जेवणाचे डबे भेट देण्यात आले .
स्वागत प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन युवा नेते आबीदभाई शेख यांनी केले .

Views: 281
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
१८ मार्च @जागतिक चष्मा दिवस

१८ मार्च @जागतिक चष्मा दिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)