@ २१ मार्च @
जागतिक वन दिन
त-हाडी ललिता खोंडे
आज जागतिक वन दिन !
‘दृष्टीआड’ असलेल्या ‘सृष्टी’ चे महत्त्व मानवाला न समजण्याचे हे अगदी उघड उदाहरण म्हणता येईल. शुध्द हवा, पिण्याचे पाणी आणि इतरही अनेक बाबी हे आपल्याला मिळतात त्या जंगलांमुळेच. मात्र चंगळवादी जीवनशैलीसाठी केल्या जाणाऱ्या बेसुमार जंगल तोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत असल्याचे १९७० च्या दशकात जाणवू लागले. त्यातून जंगले वाचवण्याची संकल्पना पुढे आली.
संयुक्त संघाच्या अन्न व शेती संघटनेच्या सदस्य देशांनी हा ‘वर्ल्ड फॉरेस्ट डे’ साजरा करण्यास सुरुवात केली.
पुढील मुद्यांची सर्वांनाच माहिती होण्यासाठी सरकार आणि विविध संस्था कार्यक्रम राबवतात.
- अनावश्यक जंगलतोड टाळणे.
- अधिक झाडे लावणे.
- जंगलांपासून मिळणारी उत्पादने आणि होणारे फायदे.
- जंगलांना सतत भेट दिल्याने मिळणारी माहिती.
जंगलांबाबत आस्था आणि जंगलतोडीमुळे होणाऱ्या हवामानातील बदलांबद्दल चिंता वाटत असणाऱ्या सर्वांना जागतिक पातळीवर व्यासपीठ मिळावे हा देखील वन दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे.
बदलत्या हवामानावर भविष्यात उपाय योजना करताना आणि धोरण ठरवताना जंगलांबाबत योग्य विचार होत असल्याची खात्री या मंचावरून एकत्रित पणे करता येईल.