• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा जांभुळणी येथे प्रारंभ
.

माणगंगा by माणगंगा
March 22, 2022
in सांगली
0
कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा जांभुळणी येथे प्रारंभ.

कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा जांभुळणी येथे प्रारंभ
.

आटपाडी ;

श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, आटपाडी संचलित कला व विज्ञान महाविद्यालयाचे जांभुळणी तालुका आटपाडी येथे विशेष श्रमसंस्कार शिबीराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

सदरचे शिबिराचे उद्घाटन, जांभुळणीच्या सरपंच,संगीता मासाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी, प्राचार्य, डॉ. विजयकुमार पाटील हे उपस्थित होते. सदर शिबिरामध्ये दि.२१ ते २७ मार्च या कालावधीत श्रमदान, प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.


राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी ग्रामविकासासाठी राबवलेल्या कार्यक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सरपंच सौ संगीताताई शिवराम मासाळ यांनी दिले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्याकडून ग्रामहिताच्या कामाची अपेक्षा व्यक्त केली. सायंकाळच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमात कु. वैशाली कांबळे व मा. अमोल मोरे, समूह समन्वयक यांनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. सात दिवस चालणाऱ्या या शिबिरात स्वयंसेवकाच्याकडून ग्रामस्वच्छता, परसबाग लागवड, शोष खड्डे व कंपोस्ट खत खड्डे खोदणे, वृक्षारोपण करणे, सर्वेक्षण, बांबू लागवड इत्यादी श्रमदान कार्यक्रम करण्यात येणार आहेत.

आजच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमात सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, या विषयावर वैशाली कांबळे व अमोल मोरे यांनी अनमोल मार्गदर्शन केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन अंकुश मुढे यांनी तर प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी माने तर आभार कू. हिने केले. उद्घाटन समारंभाचे आभार कार्यक्रम अधिकारी, प्रा. भारती देशमुखे मॅडम यांनी व प्रास्ताविक, प्रा. नागेश चंदनशिवे, कार्यक्रम अधिकारी यांनी मानले.


या कार्यक्रमात वैशाली कांबळे, रविकिरण जावीर, सचिन लवटे, डॉ. त्रिशाला भोसले, डॉ. मीनाक्षी गुरव, आटपाडी तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ. साधना पवार, डॉ. विजय कुमार पाटील प्रा. बालाजी वाघमोडे, मा. शशिकांत शिंदे, आटपाडी विधितज्ञ, प्रा. संजय ठिगळे इत्यादी मान्यवरांचे मार्गदर्शन मिळणार आहे. सदर शिबिरामध्ये जांभूळणी येथील फ्रेंड सर्कल, फ्रेंड्स ग्रुप, नवतरुण गणेश मंडळ, जय भारत गणेश मंडळ, श्रीनाथ भजनी मंडळ, श्रीनाथ लेझीम मंडळ व जिल्हा परिषद मराठी शाळा याचा विशेष सहभाग असणार आहे.

सदर शिबिरास प्रा. अभय जायभाये, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, प्रा. पोपट माळी, जिल्हा समन्वयक, सांगली, प्रा. तातोबा बदामे, विभागीय समन्वयक, तासगाव; मा. शिवाजीराव पाटील, सचिव, श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, आटपाडी; श्रीमती बाई माने, मा. तहसीलदार, आटपाडी व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, मा. मनोज भोसले हे मान्यवर भेट देणार आहेत. समारोप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून, प्रा. संजय ठिगळे, माजी विद्यापीठ समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना, कोल्हापूर हे उपस्थित राहणार आहेत. शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना समिती, कार्यक्रम अधिकारी, प्रा. नागेश चंदनशिवे व प्रा. भारती देशमुखे; श्री शिवराम मासाळ, अध्यक्ष, बळीराजा फाउंडेशन, जांभुळणी; मा. गजानन पावले, सामाजिक कार्यकर्ते, जांभुळे यांच्या वतीने करण्यात आले आहे. सदर शिबिरात कला व विज्ञान महाविद्यालय,
आटपाडीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व स्वयंसेविका सहभागी झाले आहेत.

Views: 312
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
भुतियापंती या भयपटाचा पोस्टर लाँचिंग सोहळा संपन्न…।

भुतियापंती या भयपटाचा पोस्टर लाँचिंग सोहळा संपन्न…।

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)