बामखेडा महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबीराचे उद्घाघाटन
त-हाडी प्रतिनिधी-
शाहादा तालुक्यातील बामखेडा येथील कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीराचे उद्घाटन त-हाडी येथे झाले. शिबिराचे उद्घाटन माजी सैनिक श्री प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कला विद्या प्रसारक बामखेडा संस्थेचे प्राचार्य मा. डॉ एस पी पाटील हे होते .तर प्रमुख पाहुणे म्हणून त-हाडी ग्रामपंचायतच्या सरपंच ताईसो जयश्री धनगर , उपसरपंच उजनबाई अहिरे , सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनील धनगर, माजी सरपंच सुदामा भलकार,तुळशिराम भामरे, प्रमोद परदेशी, सुभाष भामरे, उपस्थित होते. दि. २२ मार्च ते २८ मार्च दरम्यान चालणा-या या शिबिरात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यात योगासने श्रमदान, स्वयंस्वच्छता, गटचर्चा,गीतमंच, सांस्कृतिक कार्यक्रम होतील. तसेच दररोज दुपारी तीन ते पाच दरम्यान विविध विषयांवर मान्यवरांच्या बैद्धिक व्याख्यान आयोजित करण्यात आली आहेत यात
२२/३/२२
वेळ-. ३ते५
व्याख्याते- ह.भ प.अनिल पाटील वसमाने
विठ्ठल सुदामा मराठे (फेस)
विषय- राष्ट्रीय सेवा योजना एक संस्कार शाळा
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
२३/३/२२
वेळ-३ते ५
व्याख्यानते- कैलास मधुकर पाटील (जवखेडा)
प्रमोद परदेशी. (त-हाडी)
विषय-ग्रामविकासत युवकांची भुमिका
भारतीय स्वातंत्र्याची ७५वर्ष
२४/३/२२
वेळ ३ते ५
व्याख्यान- कृष्णा कोळी (त-हाडकसबे / माजी फैजी)
. युवराज जाधव (त-हाडी)
विषय – देशसेवा एक कर्तव्य
अवयव दान श्रेष्ठ दान
२५/३/२२
वेळ ३ते५
व्याख्यान- डॉ धिरज अहिरे (तोरखेडा)
अॅड- गायत्री पाटील (त-हाडी)
विषय -एड्स जाणीव जागृती
महिला आणि कायदे
२६/३/२२
वेळ -३ते५
व्याख्यान – ज्ञानेश्वर भामरे (त-हाडी)
सुरेश अहिरे. (वडाळी)
विषय राष्ट्रीय सेवा योजना आणि नेतृत्व
डिजिटल साक्षरता
२७/३/२२
वेळ ३ते५
व्याख्यान- विजय सावळे(फेस)
रमेश जायनाकर (मुंबई)
विषय- जय जवान जय किसान एक मंत्र
उच्च शिक्षणातील करियर वाटा
२८/३/२२ रोजी शिबिराचा समारोप अध्यक्ष पी.बी पटेल सेवानिवृत्त मुख्याध्यापक व अध्यक्ष ग्रामविकास संस्था बामखेडा, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ के.एच. चौधरी, डॉ विजय पाटील,बी.व्ही.चौधरी . डॉ राजेंद्र मोरे. के .बी. चौधरी उपस्थित असतील
शिबिरासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी-
डॉ. सी.एस।करंके
सहाय्यक कार्यक्रम आधिकारी
डॉ. वाय.सी.गावीत
महिला कार्यक्रम आधिकारी
डॉ. के.पी.पाटील
श्री आर.बी.मोरे
परिश्रम घेत आहेत.
फोटो -त-हाडी येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन करताना माजी सैनिक प्रकाश पाटील सरपंच जयश्री धनगर उपसरपंच उजनबाई अहिरे माजी सरपंच सुदामा भलकार प्राचार्य डॉ एस पी पाटील तुळशिराम भामरे सुनील धनगर सुभाष भामरे प्रमोद परदेशी गणेश पवार (छाया ललिता खोंडे)







