अतिशय धक्कादायक आणि दुःखद बातमी
माणगंगा न्यूज पोर्टल
जत:-धावडवाडी गावचे सुपुत्र नेहमी दुसऱ्यांना हसवणारे आणि सदैव गोरगरिबांच्या मदतीला तत्परतेने धावून जाणारे आणि आपल्या भारदस्त आवाजात प्रत्येक शुभ कार्यामध्ये जनसामान्यांची मने जिंकणारा तसेच आपल्या शासकीय सेवेमध्ये ग्रामसेवक या पदावर इमानेइतबारे प्रदीर्घ अशी सेवा देणारे बोलके व्यक्तिमत्व श्रीयुत बालम मुजावर यांचं आत्ताच थोड्यावेळापूर्वी दुःखद निधन झालं अगदी कानावर विश्वास बसत नाही अशी दुःखद बातमी समजली आणि मन हेलावून गेलं खरंच धावडवाडी गावच्या इतिहासात या योद्ध्याची जागा कोणीच घेऊ शकणार नाही ती सदैव अपूर्ण राहणार याची खंत वाटते त्यांच्या कुटुंबावर धावडवाडी गावावर आणि पंचक्रोशीत दुःखाचा डोंगर कोसळला आहे बालम भाई यांना अल्लाह ताला जन्नत मध्ये जागा देवो ही दुवा करतो आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये मी आणि माझा परिवार माझा पूर्ण गाव सहभागी आहोत







