शिरपुर पंचायत समिति येथे पंधरावा वित्त आयोग संदर्भात प्रतक्ष प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला
भटाणे ता.24
केंद्र शासना तर्फे पंधरावा वित्त आयोगाच्या येणाऱ्या निधीच्या वापर संदर्भात संपुर्ण प्रक्रीया PFMS ऑनलाईन झाली आहे.या ऑनलाईन व्यवहारामुळे संभ्रम निर्माण झाला असुन पंधरावा वित्त आयोगाच्या निधी वापरा संदर्भात उदासिनता आली आहे बहुतेक ग्रामपंचायतीची कामे झाली असुन देखील आर्थिक व्यवहार थांबलेला आहे
ई ग्रामस्वराज पोर्टल व ई टेंडरीग पासुन ते पी एफ एम एस व्यवहार कसा करावा या संदर्भात सी एस सी प्रणाली मार्फत एन आय सी कडून सरपंच ग्रामसेवक व केंद्रचालक यांना संयुक्त मार्गदर्शनपर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असुन येथील अमरीश भाई पटेल हॉल मध्ये घेण्यात आला या प्रशिक्षण कार्यक्रमात ई टेंडरींग,ऍक्शन प्लॅन डिजिटल सिग्नेचर द्वारे आर्थिक व्यवहार या विषयी मार्गदर्शन एन आय सीच्या मास्टर ट्रेनर सुजाता ठूबे यांनी केले.
प्रारंभी गट विकास अधिकारी यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन केले प्रसंगी गट विस्तार अधिकारी श्री संजय पाटील, श्री आर.जे.पावरा,तालुका समन्वयक श्री महेश पोपट वाडीले तालुक्यातील सरपंच,ग्रामसेवक व केंद्रचालक उपस्थीत होते. विस्तार अधिकारी श्री संजय एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले श्री महेश पोपट वाडीले यांनी आभार मानलेत.