आटपाडी वाळू उपसा जोमात,पोलिस व महसूल विभागाच्या कानाडोळा
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी ता आटपाडी येथील श्री राम मंदिर व दत्त मंदिर परिसरात ब्राह्मण गल्ली शेजारील ओढ्यातील वाळू उपसा रात्रीच्या वेळेला होत आहे. यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली चा उपयोग केला जातो या ट्रॅक्टरच्या आवाजामुळे रात्रभर नागरिकांना झोप लागत नाही. या ट्रॅक्टर ट्रॉली च्या आवाजाचा नाहक त्रास नागरिकांना होत आहे
ही बाब गाव कामगार तलाठी यांच्या निदर्शनाला आणून दिली असता तर त्यांनी वाळूवरती पाळत ठेवण्यासाठी एक कमिटी नेमली होती परंतु प्रत्यक्षात वाळू उपसा होत असताना या कमिटीतील सदस्यांचे मोबाईल नंबर बंद येत आहे.
त्यामुळे येथील नागरिकांनी माननीय तहसीलदार यांना लेखी निवेदन दिले आहे त्याची प्रत पोलीस स्टेशन ,गावकामगार तलाठी यांना देण्यात आले असून शासकीय यंत्रणा काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत निवेदनामध्ये म्हटले आहे की आमची घरे ओढ्याकाठी असल्याने या वाहनांच्या आवाजाचा त्रास होत आहे व वाहनांच्या आवाजामुळे झोप सुद्धा लागत नाही लहान मुलांच्या झोपेवर परिणाम होत आहे याचा बंदोबस्त तहसील कार्यालयाने करावा
तहसीलदार याना निवेदन देऊन त्याच्या प्रति पोलीस स्टेशन, गाव कामगार तलाठी यांना देण्यात आले आहे यामध्ये दिलीप कुलकर्णी ,शामराव देशपांडे, मारुती देशपांडे, श्याम देशपांडे, कल्पना इनामदार, बाळकृष्ण पाटील यांच्या निवेदनावर सह्या आहेत.







