शिरपूर शहरात उष्णतेची लाट उन्हाच्या झळांनी बेहाल उष्णतेच्या लाटेने धुळे घामाघूम
त-हाडी प्रतिनिधी
धुळे, शिरपूर तालुक्यात व त-हाडी परिसरात डोंगळाळ भाग असल्याने महाराष्ट्रात उन्हाच्या तीव्र झळा त-हाडी परिसरात जाणवत असून धुळे, शिरपूरसह उष्णतेची लाट सुरु झाली आहे. खान्देशात पुढील दोन -तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळांनी शिरपूर, त-हाडी बेहाल झाल्याचे चित्र दिसत आहे. तर दुपारच्यावेळी मुख्य रस्तेही ओस पडले असल्याचे बघायला मिळत आहे. खान्देशासह महाराष्ट्रापर्यंत सध्या सर्वच ठिकाणी उष्णतेची लाट आहे. या सर्व भागात हवामान कोरडे असून आकाश निरभ्र आहे. त्यामुळे तापमानाचा पारा वाढत आहे. उत्तरेकडून महाराष्ट्राच्या दिशेने उष्ण व कोरडे बारे वाहत आहेत. परिणामी महाराष्ट्रात तापमान वाढत चालले आहे. ही स्थिती पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार आहे. खान्देशाततील सध्याच्या तापमानात आणखी काही प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज आहे. या कालावधीत कमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. खान्देशाततही कमाल तापमान
४० ते ४१ अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे पुढचे दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट येणार आहे.. दरम्यान, धूळे, जळगाव, नंदुरबार, भुसावळ, व नाशिक जिल्ह्यात १२ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होणार आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आदी जिल्ह्यांत प्रामुख्याने पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट तीव्र असणार आहे. बुधवारी धुळे तापमान ४० तर, गुरुवारी ३९.३ अंश सेल्सिअस एवढे होते. जळगाव व नाशिक जिल्ह्यांचे कमाल तापमानही ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे.







