त-हाडी ( प्रतिनिधी )
गुड़ी पाडवा सण मांगल्याचा नववर्षाच्या स्वागतासाठी घरोघरी गूढ़या उभारुण स्वागत करण्यात येते .परंतु पोटासाठी भटकंती करत असणारे मेंढपाळ मात्र आपला वाडयावर गुड़ी उभारून नववर्षाचे स्वागत केले.

धनगर सामाजाचे वल्लर लोक मेंढ़पाळ व्यवसाय करणारे हे आपल्या मेंढया चारण्यासाठी गावगावे मेंढया, घोड़े,आपल्या पोरबाळसह भटकंती करत असतात.हे दीपावळीचा दिवा उतरविल्या नंतर मेंढया चरण्यासाठि निघतात. त-हाडी उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते.या कांद्याची पाती चारण्यासाठी मेंढपाळ व्यवसाय करणारे शिरपूर तालुक्यातील अभानपुर, अभानपुर बु, वरूळ त-हाडकसबे,शहादा तालुक्यातील काकरदा, तोरखेडा खापरखेडा कोढावळ आदि भागातील मेंढपाळ मेंढया चारण्यासाठी येतात.आणि आपला सण,उत्सव जेथे वाडा असतो .तेथे साजरा करतात. गुड़ीपाडवा सणांची गुढी वाडयावर उभारुण साजरी केला त्याचे हे बोलके
चित्र मेंढपाळ~ दगा ठेलारे-
मेंढपाळ हां आमचा वडोलपार्जित व्यवसाय असून तो आम्ही करतो. आम्ही दिवाळी सण फक्त घरी साजरा करतो. दिवाळी सणानंतरआम्ही आमच्या मेंढ्या व मुलबाळासह मेंढ्या चरण्यासाठी गावोगाव भटकांती करत फिरत असतो.त्यामुळे आम्ही दिवाळी सणानंतरचे सण-उत्सव हे ज्या ठिकाणी मेंढयाचा वाडा असले त्या ठिकाणी साजरा करतो.मग तो होळी असू की गुढी पाडवा तो वाड यावर साजरा करावा लागतो.







